Join us  

Bigg Boss 11:या कारणामुळे घराबाहेर पडला हितेन तेजवानी,आता करणार हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 7:39 AM

दर आठवड्याला बिग बॉस शोमधून नॉमिनेट झालेला एक स्पर्धक घराबाहेर पडतो. गेल्या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर पडला नव्हता.  नॉमिनेट ...

दर आठवड्याला बिग बॉस शोमधून नॉमिनेट झालेला एक स्पर्धक घराबाहेर पडतो. गेल्या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर पडला नव्हता.  नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचा कालावधी वाढवत त्यांना घरातच आणखी काही दिवस ठेवण्यात आले होते.स्पर्धक बंदगी कालरा घराबाहेर पडल्यानंतर कोणाचीही घरातून एक्झिट करण्यात आली नव्हती.मात्र आता हितेन तेजवानी या आठवड्यात घराबाहेर पडणार असल्याचे वृत्त आहे. बिग बॉस सीजन ११ च्या सुरुवातीपासूनच अर्शी खान हितेन तेजवानीवर फिदा असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र अर्शी खानचे हितेन तेजवानीशी नाव जोडणे त्याला अजिबात पटलेले नव्हते.त्यामुळे नेहमी तो अर्शी खान पासून लांबच राहणे पसंत करायचा.घरातील इतर स्पर्धकही अर्शी आणि हितेन या जोडीवर अनेक विनोदही करताना दिसले.हितेन तेजवानीला एक कलाकार म्हणून नाही तर एक चांगला व्यक्ती म्हणून पाहण्याची संधी रसिकांना बिग बॉसच्या निमित्ताने मिळाली.अखेर आता तो अलविदा म्हणत शोमधून बाहेर पडणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांचाही हिरमोड होणार आहे. Also Read:Bigg Boss11: हितेन बनला अर्शी खान तर बिकनीमध्ये प्रियांकने दाखवला जलवा,SEE PICSबिग बॉसमध्ये एंट्री मारण्यापूर्वी हितेन तेजवानीने सिएनएक्समस्तीला खास मुलाखत दिली होती.त्यावेळी बिग बॉस शोचा हिस्सा बनणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला होता.जितके दिवस तो घरात राहणार खरा चेहराच रसिकांना पाहायला मिळेल असे त्यावेळी त्याने सांगितले होते.घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला निगेटीव्ह भूमिका साकारायची इच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.'कुटुंब','क्योंकि साँस कभी बहू थी' या मालिकेतून हितेन तेजवानीने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.विशेष म्हणजे 'कुटूंब' या मालिकेतील त्याची आणि गौरी प्रधानची जोडीदेखील हिट झाली होती.छोटा पडदा गाजवल्यानंतर 'साँसे' या सिनेमातही तो झळकला होता.काळानुरूप मालिकांचे विषय हे बदलत चालले आहेत.पूर्वी सांस-बहुच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत्या.त्यानंतर रिअॅलिटी शोचा काळ आला म्हणून बिग बॉससाठी विचारणा झाली त्यानुसार त्याने हा शो स्विकारल्याचे सांगितले होते.समजुतदार,सोज्वळ भूमिकां व्यतिरिक्त वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे त्याने म्हटले होते.त्यामुळे ज्या संधी मिळतील त्या इमेज बदणा-या अशाच भूमिका साकारणार असल्याचा निश्चय केल्याचे हितेनने सांगितले होते.