Join us

बिग बॉस-११ची विजेती शिल्पा शिंदे वडिलांना दिलेले वचन पूर्ण करणार, जिंकलेल्या ४४ लाखांमधून करणार ‘हे’ काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 6:23 AM

प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर हैं' मालिकेतील अंगुरी भाभी, अर्थात अभिनेत्री शिल्पा शिंदे 'बिग बॉस-11' शोची विजेती ...

प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर हैं' मालिकेतील अंगुरी भाभी, अर्थात अभिनेत्री शिल्पा शिंदे 'बिग बॉस-11' शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत शिल्पाने टीव्ही अभिनेत्री हिना खानवर मात केली. हिना खान ही 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या टीव्ही मालिकेत अक्षराच्या भूमिकेत होती. बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य विकास गुप्ता या रकमेपैकी 6 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडला होता. त्यामुळे विजेती शिल्पा शिंदेच्या वाट्याला ४४ लाख रुपये आलेत. या रकमेचे शिल्पाने काय केले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तिने हे पैसे कशावर खर्च केले हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता असेन. मात्र तिने ही रक्कम अद्याप खर्च केलेली नाही. कारण ही रक्कम तिला एका विशेष कामासाठी वापरायची आहे. या पैशांमधून शिल्पाला वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. काही मुलं आपल्या आई वडिलांची उतारवयात काळजी घेत नाहीत. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी या ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचा संघर्ष करावा लागतो. अशा दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज होम उभारण्याचं आश्वासन शिल्पाने वडिलांना दिली होती. या ओल्ड एज होमच्या माध्यमातून या ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध होईल आणि आपल्या वयाच्या लोकांसोबत ते वेळ घालवू शकतात अशी शिल्पाची भावना आहे.शिल्पाच्या या विचाराचं नक्कीच कौतुक व्हायला हवं. बिग बॉसच्या घरातही शिल्पाला रसिकांनी तिच्या चांगल्या कामामुळे पसंत दिली होती.शिल्पा एकटीच सर्व स्पर्धकांसाठी जेवण बनवायची.छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शिंदेने चाळीशी पार केली आहे.वास्तविक तिच्या आयुष्यात लग्नाची एक वेळ आली होती. विशेष म्हणजे लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु ऐनवेळी असे काही घडले ज्यामुळे तिचे लग्न मोडले.असो आता शिल्पाने तिच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने तिच्या लग्नाविषयी सांगितले की, ‘मी असे म्हणत नाही की, आयुष्यात मी कधीच लग्न करणार नाही. खरं तर माझ्या भविष्यात नेमके काय लिहिले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी हे स्पष्ट करू इच्छिते की, सध्यातरी मी लग्नाविषयी विचार करीत नाही. मला सिंगल राहायला आवडते. कारण मी सध्या स्वतंत्र जीवन जगू इच्छिते.’