बिग बॉस सीझन 12 नुकताच सुरू झाला आहे. इतर सीझनप्रमाणे या सीझनमध्येही स्पर्धकांची भांडणं, त्यांच्यातील वाद, रोमान्स याचीही नेहमीच चर्चा होत आली आहे. मात्र आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे बिग बॉससीझनचा स्पर्धक दीपक ठाकुरची विचित्र जोड्या भोवती फिरत राहणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपातून हे प्रसिध्द हाऊस आता हाऊस मध्ये एकटे प्रवेश करणाऱ्या सेलिब्रिटींच्या आणि सामान्य माणसांच्या जोड्यांशी स्पर्धेचा सामना कराव्या लागणाऱ्या एका अफलातून मिश्रणाने भरला आहे. अशीच एक औत्सुक्यपूर्ण जोडी असणार आहे बिहारची, एक गायक व एका फॅनची, गुणवान संगीतकार दीपक ठाकूरने बॉलीवूडच्या 'गँगज ऑफ वासेपूर' आणि 'मुक्काबाज' या सिनेमांना संगीत दिले आहे. दीपक त्यांची चाहती उर्वशी वाणी सोबत या घरात एंट्री केली आहे.
या तरुण संगीतकाराला घरात कंपनी देण्यासाठी आले आहेत भारताचे भजनसम्राट गुरू- अनुप जलोटा, आणि उदयोन्मुख संगीतकारांना कंपनी देण्यासाठी ते अतिशय खूष झाले आहेत. या शोमधील पहिल्याच दिवशी, अनुपजींनी दीपकला गाण्यांच्या संगीतरचनेत त्यांच्या सारखे करण्याचे आव्हान दिले. दीपकने बिग बॉस वरील एका विचित्र गाण्याचे थेट सादरीकरण केले आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. संपूर्ण शोची संकल्पना सुंदररीत्या वर्णन करणारे एक गाणे दीपकने गायले. त्याचे गाणे बिग बॉस च्या घरात राहणाऱ्या सर्वांमध्ये आणि सर्व प्रेक्षकांच्या पसंती पात्र ठरले आहे.
६५ वर्षांच्या अनूप जलोटा यांना ‘बिग बॉस’च्या घरात राहण्यासाठी दर आठवड्याला ४५ लाख रूपये मिळणार आहेत. अनूप जलोटा यांची प्रेक्षकांच्या मनातील प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. आपल्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये ते वादांपासून चार हात लांब राहिलेत. अशास्थितीत ‘बिग बॉस’च्या घरात अन्य स्पर्धकांशी ते कसे निपटतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
काम कठीण केले पाहिजे. त्यामुळेच मी बिग बॉसच्या घरात जायला तयार झालो. जर चित्रपटातील गाणी गायली असती तर सहज यश मिळवले असते. पण, मी भजन निवडले. भजन क्षेत्रात करियर करणे सोपे नव्हते. मी नेहमीच आव्हानात्मक काम केले आहे. बिग बॉसमध्ये देखील चॅलेंज स्वीकारायला आवडेल. तीन महिने तिथे राहणे कठीण आहे. तिथे मी योगा, व्यायाम व संगीतचा रियाज करेन, असे अलीकडे अनूप जलोटा म्हणाले होते.