नेहमीप्रमाणे बिग बॉस 13ची धुमधडाक्यात सुरूवात होताच कलाकारांचे नवीन नवीन गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. गोविंदाची भाची आरती सिंह या शोची स्पर्धक आहे. या शोमध्ये येताच तिने तिच्या खाजगी आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला आहे. तिच्या आयुष्यातील हा काळ सगळ्यात आव्हानात्मक आणि संघर्षाचा काळ होता. इतर कलाकारांप्रमाणे तिला ही डिप्रेशनचा सामना करावा लागला. काम मिळत नसल्याच्या तणावामुळेच आरती ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्याचा परिणाम तिच्या करियरवरही झाला. तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. मात्र आपली प्रचंड इच्छाशक्ती आणि थोडे फार उपचार याच्या जोरावर या डिप्रेशनमधून बाहेर पडल्याचं तिने सांगितले.
त्यावेळी भाऊ कृष्णाने यातून बाहेर पडण्यासाठी तिला प्रचंड मदत केली. तसेच आरतीने पुढे सांगितले की, लग्नासाठी तिला स्थळं येत होती. एक स्थळ तिला खूप आवडले होते. मात्र त्यांना तिच्या डिप्रेशनविषयी कळताच त्यांनी लग्नासाठी होकारच कळवला नव्हता. मात्र आईने मोठी हिंमत दिली आणि आज त्यामुळेच तिने या आजारावर मात करत पुर्णपणे फिट असल्याचे सांगितले.
'उडान', 'मायका', 'देवों के देव महादेव', 'वारिस', 'ग्रहस्थी', 'ससुराल सिमर का', 'उतरन' यांसारख्या मालिकेत आरती झळकली आहे. आरती शेवटची 'उडान' मालिकेत झळकली होती. सध्या बिग बॉसच्या घरात आरती खूप चांगले परफॉर्म करत आहे.