लॉकडाऊननंतर टीव्ही मालिकांचे शूटींग पुन्हा सुरु झालेय. मालिकांचे नवे भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अशात अनेक लोकप्रिय मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांना रिप्लेस केले जातेय. नुकतेच एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’ मधून करण सिंग ग्रोव्हरला रिप्लेस केले गेले. आता कदाचित ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील गोरी मॅम अर्थात सौम्या टंडन ही सुद्धा शोला अलविदा म्हणणार असल्याचे कळतेय.
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, सौम्याने ‘भाभीजी घर पर है’ मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सौम्या टंडनच्या जागी कोण येणार? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर तिची जागा शेफाली जरीवाला घेणार असल्याचे कळतेय. शेफालीने तूर्तास याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.
अलीकडे सौम्याने पेमेंटमध्ये झालेल्या कपातीबद्दल जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दलची चिंताही तिने बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी सौम्याच्या हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर निर्मात्यांनी सौम्याला काहीदिवस घरी राहण्यास सांगितले होते. सौम्या ‘भाभीजी घर पर है’ हा शो नेमक्या कोणत्या कारणाने सोडतेय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिने याबद्दलची अधिकृत घोषणाही केलेली नाही. पण सौम्या या मालिकेतून गेलीच तर प्रेक्षकांसाठी तो मोठा धक्का असेल, हे मात्र नक्की.
सौम्याच्या जागी अनिता भाभीच्या भूमिकेत दिसणार असलेली शेफाली जरीवाला सलमानच्या ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली होती. यात तिने वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवली होती. या शोमुळे शेफालीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.