Join us

Bigg Boss 13: पहिल्याच दिवशी रंगला हाय व्हॉल्टेज ड्रामा, एक्स बॉयफ्रेंडसोबत बेड शेअर करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:24 IST

Bigg Boss 13 : सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन 13' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरामध्ये स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे.

सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन 13' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरामध्ये स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे. या सीझनमध्ये घरामध्ये अनेक बदल झालेले दिसणार आहे. घरात एंट्री केल्या केल्या स्पर्धकांमध्ये वाद सुरु झाले आहेत. 

रश्मि देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. अमर उज्जालाच्या रिपोर्टनुसार, दोघे एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. कदाचित या गोष्टीची सल दोघांना टोचते आहे. रिपोर्टनुसार रश्मि देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांना घरात एक बेड शेअर करायला सांगण्यात आला. रश्मिने एकत्र बेड शेअर करण्यास नकार दिला. तेव्हा सिद्धार्थने तिला सांगितले की हा बिग बॉसचा नियम आहे आपल्याला असं करावं लागेल.

शोच्या सुरुवातीलाच स्पर्धकांमध्ये वाद विवाद होण्यास सुरुवात झाली.  पारस छाबडा आणि आसिम रिआज यांच्यात देखील जोरदार भांडण झाले. पारसने आसिमला म्हटलं तुझ्या श्रीमुखात लगावेन. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

रिपोर्टनुसार रश्मी देसाईला बाकीच्या स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन देण्यात आलं आहे. असं वृत्त आहे की रश्मी बॉयफ्रेंड अरहान खानसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. या घरात जाण्यासाठी रश्मीने १.२ कोटी मानधन घेतलं आहे. याच कारणामुळे तिला जास्त मानधन देण्यात आलं आहे. 

टॅग्स :बिग बॉसरश्मी देसाई