Join us

Bigg Boss 13 : शहनाज गिलला वडिलांनी सिद्धार्थ शुक्लापासून दूर राहण्याची दिली शपथ, फॅन्सनं दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:00 PM

शहनाज गिलचे वडील संतोक सुख यांनी तिला सिद्धार्थ शुक्लापासून दूर राहण्याची शपथ दिली आहे.

बिग बॉस १३मध्ये आज रात्रीपासून स्पर्धकांच्या नातेवाईकांचे येणं-जाणं सुरू झालं आहे. शोच्या निर्मात्यांनी सकाळीच बरेच प्रोमोज सोशल मीडियावर रिलीज केले आहेत. यातील एका प्रोमोत संतोक सुख आपली मुलगी शहनाज गिलला सिद्धार्थ शुक्लापासून दूर राहण्याची शपथ देताना दिसत आहेत. संतोक सुख यांची ही गोष्ट बिग बॉसच्या प्रेक्षकांना खटकली आहे. 

सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासून दिल्लगी करताना दिसत आहेत. त्यात शहनाजचं सिद्धार्थवर प्रेम असल्याचं जगजाहीर झालं आहे. त्यात शोमध्ये कित्येकदा शहनाजने सिद्धार्थवर प्रेम असल्याचे सांगितले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे.

सोशल मीडियावर ही जोडी सुपरहिट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे दोघे एकमेकांपासून बोलणं बंद करू नये असं वाटत आहे. कित्येक लोक संतोक सुख यांना सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल यांच्या नात्यातील कबाब की हड्डी बोलत आहेत.

एका चाहत्याने प्रोमोवर कमेंट करत लिहिले की, खऱ्या प्रेमाला शेवटी या सगळ्या गोष्टींपासून का जावे लागते? सिद्धार्थ व शहनाज का एकत्र राहू शकत नाही? तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, सिद्धार्थसोबत शहनाजचा गेम आणखीन सुधारतो.

वडीलांना शपथ दिल्यामुळे आता शहनाज सिद्धार्थपासून लांब राहणार का व बोलणार नाही का, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :बिग बॉसशेहनाझ गिल