सर्वात वादग्रस्त मानला जाणारा 'बिग बॉस' या शोची सुरूवात झाली आहे. यंदाचा १३ वा सिझन आहे. सुरूवातीलाच स्पर्धकांना एका हटके टास्कला सामोरे जावे लागले. अखेर प्रत्येकाला हा टास्क करणे अनिवार्य होते. जेव्हा हा टास्क देण्यात आला तेव्हा प्रत्येक स्पर्धकाच्या चेह-यावर वेगळेच भाव उमटले होते. 'बीबी हॉस्पिटल' असे या टास्कचे नाव होते.
या टास्कमध्ये दोन करण्यात आल्या होत्या. हा टास्क सुरू होण्यापूर्वीच पारस छाबडा आणि देवोलीना भट्टाचार्जी यांनी क्वीट केला होता. या सगळ्यांमध्ये सिद्धार्थ शुक्लानेच यशस्वीरित्या हा टास्क पूर्ण केला. यावेळी सिद्धार्थ शुक्लालाही खूप टॉर्चर करण्यात आले होते. मात्र परिस्थीतीचे गांभिर्य राखत त्याने दिलेले सर्व टास्क पूर्ण केलेत.
सिद्धार्थच्या चेह-यावर गायीचे शेण आणि चिखल चेह-याला फासण्यात आले, तसेच पायाचे व्हॅक्सिग केले गेले, तर कधी त्याच्या अंगावर बर्फ टाकण्यात आला. जर आगामी काळाता सिद्धार्थ अशाच प्रकार यशस्वीरित्या टास्क पूर्ण करत राहिला तर सगळ्या स्पर्धकांना तो जोरदार टक्कर देणार हे मात्र नक्की. पहिल्याच टास्कमध्ये सिद्धार्थ हा सगळ्यात जास्त स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून समोर आला आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांसमोरही सिद्धार्थपुढे टिकणे हे मोठे आव्हान असणार आहे.
दुस-याच दिवशी या सीन्सला लागली कात्री; काय ‘बेड शेअरिंग’चा कन्सेप्ट पडला भारी?
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच स्पर्धकांचे बेड पार्टनर ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावेळी मुलींना मुलांसोबत बेड शेअर करायचे होते. पण कदाचित हा नवा कन्सेप्ट ‘बिग बॉस 13’वर भारी पडताना दिसतोय. होय, 1 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या शोच्या एपिसोडमध्ये जे काही दिसले त्यावरून तरी हेच दिसतेय. ‘बिग बॉस’चे सर्व स्पर्धकांची सकाळ गाण्याने होते. शोच्या सुरुवातीला सर्वजण झोपलेले दिसले.
यानंतर गाणे वाजताच सर्व स्पर्धक उठतात आणि डान्स करतात. पण 1 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये असे काहीही दिसले नाही. गाण्याऐवजी किचनमधून या एपिसोडची सुरुवात झाली. सर्व कटेस्टंट डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करताना दिसले. ‘बिग बॉस’ने इतक्या वर्षांची परंपरा का तोडली ? गाण्याने शोची सुरुवात का झाली नाही ? असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडला होता.
खरे तर मुलींना मुलांसोबत बेड शेअर करावा लागणार याची घोषणा होताच, यंदाच्या सीझनवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बेड शेअरिंग आणि अमीषा पटेलने दिलेला पहिला टास्क यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.तूर्तास रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला बेड शेअर करत आहेत. बेड शेअरिंगनंतर पहिल्या तीनच दिवसांत रश्मी आणि सिद्धार्थमधील जवळीक वाढू लागल्याचे दिसतेय.