Join us

अलीच्या विरहात जास्मीन भसीन रात्रभर रडली अन् कोरोना टेस्ट करावी लागली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 16:41 IST

अली गेला आणि बिग बॉसच्या घरात जास्मीनच्या अश्रूंचा पूर आला...

ठळक मुद्दे नुकत्याच एका टास्कमध्ये जिंकल्यानंतर अभिनवने ‘इम्युनिटी स्टोन’ अर्थात सुरक्षित राहण्याची ताकद मिळविली आहे. अभिनव शुक्ला एजाजसमवेत या खेळाचा फायनलिस्ट ठरला आहे.

‘बिग बॉस 14’ हा रिअ‍ॅलिटी शो आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. अशात घरात घमासान सुरु आहे. फायनलिस्ट बनण्याची चढाओढ सुरु आहे. अशात ‘बिग बॉस 14’च्या घरातील स्पर्धक जास्मीन भसीनची कोरोना टेस्ट करण्यात आल्याची बातमी आहे.बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, मागच्या टास्कमध्ये स्पर्धक अली गोनी घरातून बाहेर पडला. अली गोनीने जास्मीनसाठी बिग बॉसचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. अली गेला आणि बिग बॉसच्या घरात जास्मीनच्या अश्रूंचा पूर आला. अली गेल्याने जास्मीन रात्रभर रडली. मग काय, जास्मीनला ताप चढला.

डॉक्टरला बोलवण्याची वेळ आली. डॉक्टरांनी उपचार केलेत, पण सोबत कोरोना टेस्ट करण्याचा सल्लाही दिला. त्यानुसार, जास्मीनची कोरोना टेस्ट केली गेली. सुदैवाने तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली.उपचारादरम्यान जवळजवळ दिवसभर जास्मीन बिग बॉसच्या घरातून गायब दिली. त्यामुळे जास्मीन घरातून बाहेर पडली की काय? असा सवाल चाहत्यांना पडला होता. पण जास्मीन अद्यापही शोमध्ये असल्याचे कळतेय.

एली गोनी पुन्हा येणार?जास्मीनसाठी अली गोनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला असला तरी लवकरच तो पुन्हा शोमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एलीचे इविक्शन केवळ एक ट्विस्ट आहे. एली गोनी कधी एन्ट्री मारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तो येणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात येऊन स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या सगळ्या वाटाघाटीतून बिग बॉसला अखेर त्यांचे ‘टॉप 4’ स्पर्धक मिळाले आहेत. जास्मीन भसीन, रुबीना दिलैक, राहुल वैद्य आणि एजाज खान या स्पर्धेच्या 14व्या पर्वाचे ‘टॉप 4’ स्पर्धक आहेत. नुकत्याच एका टास्कमध्ये जिंकल्यानंतर अभिनवने ‘इम्युनिटी स्टोन’ अर्थात सुरक्षित राहण्याची ताकद मिळविली आहे. अभिनव शुक्ला एजाजसमवेत या खेळाचा फायनलिस्ट ठरला आहे.

 

टॅग्स :बिग बॉस १४