अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' कलर्स चॅनलवर सुरुवात झाली आहे. कोरोना काळात या शोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकांना अनेक सुविधा घरात मिळणार आहेत. प्रत्येक सीझन प्रमाणेच बिग बॉस 14 चे सूत्रसंचालन देखील सलमान खानच करणार आहे. या शोमध्ये यंदा स्पर्धकांसोबत बिग बॉसचे जुने स्पर्धकही दिसणार आहेत. त्यामुळे यावेळीचे बिग बॉस जास्त खास असणार आहे. रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, एजाज खान, जॅस्मिन भसीन, निकिता तांबोली, निशांत मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार शानू, पवित्रा पुनिया, राहुल वैद्य यांनी आतापर्यंत घरात प्रवेश केला आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान तुफानी सीनियर्स म्हणून 14 दिवसांसाठी बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसतील. सिद्धार्थ शुक्ला 13 व्या सीझनचा व्हिनर आहे. तर हिना खान 12 ची फर्स्ट रनअप आहे. सिद्धार्थ शुक्लाकडे बेडरूमचा, तर गौहर खानचा किचनवर कंट्रोल असेल. स्पर्धकांच्या पर्सनल गोष्टी हिनाच्या ताब्यात असतील. आजपासून सुरू झालेला बिग बॉसचा १४ वा सीझन जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे. रोज साडे दहा वाजता बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून शनिवार-रविवारी नऊ ते दहा वाजता या शोचे प्रसारण होणार आहे. सलमान एका एपिसोडसाठी घेणार 20 कोटीसलमान खानला 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी देण्यात येणार मानधन हे प्रत्येकवेळी चर्चेचा विषय असतो. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानला 20 कोटी एका एपिसोडसाठी देण्यात येणार आहे. पूर्ण सीझनसाठी 450 कोटींचे मानधन सलमानला मिळणार आहे. राधे माँ हाएस्ट पेड कंटेस्टेंटराधे माँ या सीझनमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी स्पर्धक आहे. राधे माँ ला प्रत्येक आठवड्यासाठी 25 लाख दिले जाणार आहेत. स्वत:ला देव समजणारी राधे माँ ला या शोमध्ये बघण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. सिद्धार्थ शुक्लाने घेतले किती मानधन?मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या मेकर्सकडून सुद्धा सिद्धार्थने जबरदस्त रक्कम घेतली आहे. सलमानची फी नेहमीच चर्चेत असते पण यावेळी सिद्धार्थची फी देखील आश्चर्यचकित करणारी आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्लाला प्रत्येक आठवड्यासाठी 35 ते 40 लाखांचे मानधन दिले जाणार आहे. अर्थात सलमान खानच्या मानधनासमोर हे मानधन काहीच नाही. पण टीव्ही अभिनेता म्हणून सिद्धार्थला मिळालेली रक्कम हैराण करणारी आहे.