तीन दिवसानंतर ‘बिग बॉस 14’चा फिनाले आहे. वोटिंग्स लाइन्स सुुरू आहेत आणि चाहते आपल्या आवडत्या कंटेस्टंटला भरभरून वोट करत आहेत. सध्या रूबीना दिलैक आणि राहुल वैद्य या दोघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळतेय. अशात राहुल वैद्यच्या चाहत्यांनी काय करावे तर चक्क रस्त्यावर उभे राहून ते राहुलसाठी वोट मागत आहेत.ट्रेंड्स बघता, रूबीना राहुलपेक्षा काहीशी आघाडीवर असल्याचे कळतेय. यामुळे राहुलच्या फॅन्सची चिंता वाढली आहे. अशात चाहते राहुलच्या पारड्यात सर्वाधिक मतं पडावीत, यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. बिग बॉसच्या स्पर्धकासाठी रस्त्यावर उभे राहून पोस्टर्स झळकवत मतं मागण्याची ही या शोच्या इतिहासातील कदाचित पहिली वेळ असावी.
‘बिग बॉस 14’चे प्रत्येक अपडेट देणा-या ‘द खबरी’नुसार, 17 फेबु्रवारीला संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये रूबीनाला 41 टक्के वोट मिळाले असून राहुलला 27 टक्के वोटींग आले आहे.
अली गोनी याला 17 टक्के, तर निक्की तंबोली व राखी सावंत या दोघींना अनुक्रमे 8 व 7 टक्के मतं मिळाली आहेत. हे ट्रेंड्स बघता रूबीना या सीझनच्या विजेत्यापदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. जाणकारांच्या मते, ट्रेंड्समध्ये रूबीना आघाडीवर असली तरी, ऐनवेळी राहुलही बाजी मारू शकतो. राहुल वैद्यचे फॅन फॉलोइंग गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. याचा फायदा त्याला होऊ शकतो.
येत्या रविवारी ‘बिग बॉस 14’चा फिनाले रंगणार आहे. यादरम्यान लवकरच बिग बॉसच्या घरातून एक सदस्य घराबाहेर जाऊ शकतो. मिड वीक इविक्शनमध्ये कोण घराबाहेर जातो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.