राखी सावंतने छेडले सूर अन् कावळ्याने दिली दाद...! हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:19 PM2021-02-11T17:19:22+5:302021-02-11T17:20:13+5:30
कावळा म्हणतो काव काव... होय, सध्या राखीचा एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणे फार काही अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. सध्या राखी बिग बॉस 14 मध्ये धुमाकूळ घालतेय. राखीचा ड्रामा नाही, असा एकही दिवस बिग बॉसच्या घरात उगवत नाही. आता तिने काय केले तर ‘बिग बॉस 13’ची सर्वात मोठी एंटरटेनर ठरलेल्या शहनाज गिलची नक्कल केली. होय, सध्या राखीचा एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये शहनाज गिल कावळ्याची बोलताना तुम्ही पाहिली असेल. कावळ्याच्या काव काव आवाजात शहनाज त्यांच्याशी बोलायची. आता राखीने काहीसे असेच केले.
व्हिडीओत राखी गार्डन एरियात बसून सिंगर बनण्याची इच्छा व्यक्त करतेय. ‘तानसेन जी आप कहां हो, आप मुझे एक सिंगर बनाओ. आपमें और मेरे में ज्यादा फर्क नहीं है.आप जब गाते थे तो दिए जल जाते थे, मैं जब गाती हूं तो दिए बुझ जाते हैं. तो पावर तो है ना,’ असे ती म्हणते. यानंतर ती बिग बॉससोबतही बोलते. ‘अगर मेरे गाने से एक भी पक्षी आ जाए तो मैं सक्सेसफुल सिंगर हंू...,’ असे म्हणत ती सूर लावते आणि मग काय, ती गायला सुरुवात करताच बीबी हाऊसच्या आवारातील एक कावळा काव, काव करायला लागतो. पण यामुळे राखी भडकते. अरे गाने तो दे, बीच में क्यों बोल रहा है, असे म्हणून कावळ्यावर बरसते. इतक्यात तिथे जान कुमार येतो. हा कोणता राग आहे, मला सांग, असे तो राखीला म्हणतो. शिवाय तुझे हात वर जात आहेत पण सूर तिथेच अडकलेत, असे म्हणून हसू लागतो.