Join us

Bigg Boss 15: अफसाना खानचा पुन्हा सुटला स्वत:वरचा ताबा, शोमधून झाली हकालपट्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:39 AM

Afsana Khan Khan Out From Bigg Boss 15: अफसानाने कथितरित्या चाकूने स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिग बॉसने तिला तडकाफडकी घराबाहेर काढल्याचे कळतेय. 

बिग बॉस 15’मध्ये (bigg boss 15 ) सध्या एकापाठोपाठ एक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळत आहेत. ताज्या माहितीनुसार, लोकप्रिय पंजाबी सिंगर अफसाना खान (Afsana Khan) हिची शोमधून हकालपट्टी करण्यात आलीये.  अफसानाने कथितरित्या चाकूने स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिग बॉसने तिला तडकाफडकी घराबाहेर काढल्याचे कळतेय. ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, अफसानाला शोमध्ये पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आला. यानंतर वैद्यकीय कारणांमुळे तिला शो बाहेर जावं लागलं. काही वृत्तानुसार, व्हीआयपी एक्सेस टास्क हरल्यानंतर अफसानाचा स्वत:वर ताबा सुटतो. उमर रियाज तिला व्हिआयपी झोनमधून बाद करतो. यामुळे अफसाना संतापते. मी सर्वांची टार्गेट आहे. मला सगळे बाहेर काढू इच्छितात, असं म्हणत ती जोरजोरात ओरडू लागते आणि रागारागात किचनमधील चाकू उचलते. तिने चाकू उचललेला पाहून उमर, जय आणि करण लगेच तिच्याकडे धाव घेत तिला थांबवतात. पण तरीही अफसाना जोरजोरात किंचाळते.

याचदरम्यान तिचे शमिता शेट्टीसोबत जोरदार भांडण होतं . या भांडणात अफसानाची हिंसक वागणूक बघून बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियात एकत्र यायला सांगतात आणि अफसाना खानला शो बाहेर करण्याची घोषणा करतात.बिग बॉस 15 च्या ताज्या प्रोमोमध्ये अफसाना व्हिआयपी झोन टास्कमधून बाहेर पडल्यानंतर स्वत:वरील ताबा गमावून बसल्याचं दिसतेय. इतकंच नाही तर अफसाना किचनमधला चाकू उचलून स्वत:ला मारण्याची धमकी देतानाही दिसतेय. घरातील अन्य सदस्य तिच्या हातून चाकू खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आज टेलिकास्ट होणा-या एपिसोडमध्ये अफसाना नेमक्या कोणत्या कारणावरून शोबाहेर गेली, ते कळणार आहे.याआधी अफसानाला असाच पॅनिक अटॅक आला होता. तेव्हाही तिने बिग बॉसच्या घरात ड्रामा केला होता. यावरून सलमानने तिला चांगलंच सुनावलं होतं.

टॅग्स :बिग बॉस