‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) धमाकेदार एन्ट्री घेणारी टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टचा (Donal Bisht) घरातील प्रवास दोन आठवड्यांतच संपला. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर डोनलने ‘बिग बॉस 15’बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याचदरम्यान तिच्या एका खुलाशानंतर बिग बॉसच्या घरात सध्या फुलत असलेली तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व करण कुंद्रा ( Karan Kundrra ) यांच्यातील लव्ह अँगल प्लान्ड तर नाही ना? अशी शंका चाहत्यांनी उपस्थित केली आहे.गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी व करण कुंद्रा यांच्यातील रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरही या हळूवार फुलत असलेल्या नात्याची जोरदार चर्चा आहे. अगदी ट्विटरवर ‘#TejRan ’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशात डोनल बिष्टने केलेल्या खुलाशाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
व्हिजे एंडीला दिलेल्या मुलाखतीत डोनल बिष्टने बिग बॉसच्या मेकर्सवर अनेक सवाल उपस्थित केले. ‘करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली, सिम्बा नागपाल आणि अकासा सिंग यांना बिग बॉसकडून सतत कन्फेशन रूममध्ये बोलवले जात होते. बाहेर आल्यावर बिग बॉस काय म्हणाले असं विचारल्यावर पर्सनल इश्यू होता, असं म्हणून ते बोलायचं टाळायचे,’ असे डोनल म्हणाली.सोशल मीडियावर तेजस्वी व करण कुंद्राच्या लव्ह अँगलची जोरदार चर्चा आहे. म्हणजे, #TejRan करा, असा मॅसेज आत आला होता का? असा प्रश्न व्हिजे एंडीने विचारल्यावर ती म्हणाली, ‘कदाचित असं झालं असावं. असं खरंच झालं, असं मी म्हणणार नाही. पण काही सदस्यांना सर्रास कन्फेशन रूममध्ये बोलावलं जायचं, हे मी पाहिलं आहे. एकदा करण कन्फेशन रूममधून बाहेर आल्यावर काहीसा अस्वस्थ वाटला होता. त्याला विचारल्यावर त्यानं बोलणं टाळलं होतं,’असे डोनल म्हणाली.आता डोनल बिष्टच्या या दाव्यात किती सत्यता आहे, हे तर तिलाच माहित. तेजस्वी व करणच्या लव्ह अँगलमध्ये किती सच्चेपणा आहेत, हे शेवटी वेळ आल्यावर कळेलच.