आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत येणारे अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) यांनी नुकतीच 'बिग बॉस 15' (Bigg boss 15) मध्ये एन्ट्री घेतली आहे. शनिवारी Bigg boss 15चा एक प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री करत असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे केवळ हा प्रोमो समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अभिजीत बिचुकले यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'बिग बॉस मराठी 2' मध्ये आपल्या वर्तनामुळे आणि काही वादग्रस्त कारणांमुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये ते कशा पद्धतीने राडा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी त्यांनी लोकमत ऑनलाइनला मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी त्यांची Strategy सांगितली आहे.
'बिग बॉस मराठी' गाजवल्यानंतर अभिजीत बिचुकले 'Bigg boss 15'मध्ये सहभागी होत आहेत. या घरात ते वाईल्ड कार्ड एन्ट्री करत असून त्यांच्यासाठी हिंदी बिग बॉसमधील हा पहिलाच अनुभव आहे. विशेष म्हणजे Bigg boss 15 जिंकायच्या हेतूने घरात प्रवेश केलेल्या बिचुकले यांनी त्यांची एक खास Strategy आखली आहे. घरात त्यांचा वावर कसा असेल हे त्यांनी सांगितलं आहे.
"Strategyचं सांगायचं झालं. तर या सगळ्या गोष्टी मुळात घरात गेल्यावरच ठरत असतात. कारण, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. जर तुम्ही माझ्याशी गोड बोललात तर मी देखील तुमच्याशी तसाच गोड वागणार. पण, जर तुम्ही माझ्याशी कारल्याप्रमाणे वागत असाल. तर, मी कारल्यापेक्षाही कडू पद्धतीने वागेन", असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
दरम्यान, घरातील स्पर्धक ज्या पद्धतीने वागतील त्याच पद्धतीने आपण घरात वावरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बिग बॉस मराठी २मध्ये अभिजीत बिचुकले वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आले होते. त्यामुळे आता Bigg boss 15 मध्ये ते कशाप्रकारे धुमाकूळ घालतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे.