‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 15) घरात कधी काय होईल सांगता यायचं नाही. आता ‘बिग बॉस 15’चे उदाहरण घ्या. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व मायशा अय्यर (Miesha Iyer) या दोघींमध्ये सुरूवातीला चांगला बॉन्ड होता. पण आता दोघींचं नातं बदलताना दिसतंय. कॅप्टन्सी टास्कनंतर मायशा व उमर रियाज यांना स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या भेटवस्तू द्यायच्या होत्या. पण या प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू दिल्यानंतर त्यांचे गुण कमी होणार होते. त्यामुळे मायशाने तेजस्वीला गिफ्ट न देण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे तेजस्वी संतापली. रडतानाही दिसली. यानंतर टास्करनंतर तिने पुन्हा एकदा मायशाला गिफ्ट देण्याची विनंती केली. पण मायशाने नकार दिला. पण तेजस्वीने मायशाचा पिच्छा सोडला नाही. तू मला गिफ्ट दे, मी तुला इंधन देईन, असं ती म्हणाली. तेजस्वीचा हा ‘डर्टी गेम’ चाहत्यांना आवडला नाही.ट्विटरवर यावरून तेजस्वी चांगलीच ट्रोल झाली. अनेकांनी तिला ‘सेल्फिश नागीन’चा टॅग दिला. तेजस्वीच्या अशा गेमनंतर ती हा शो कधीच जिंकू शकणार नाही, असं भाकित एका युजरने केलं.
दिवाळी गिफ्ट न मिळाल्याने तेजस्वी रडली. पण अनेकांनी हे तिच्याच कर्माचं फळ असल्याचं म्हटले. विशाल कोटियनसोबत तू कसं वागलीस, विसरलीस का? हे तुझ्याच कर्माचं फळ आहे, असं एका युजरने लिहिलं.
तेजस्वीने 10 वर्षांपूर्वी ‘2612’ या शोद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत एन्ट्री मारली होती. यानंतर संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता, कर्णसंगिनी अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली. टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. रोहितची ती फेवरेट कंटेस्टंट बनली होती. तेजस्वीचा ‘पहरेदार पिया की’ हा शो चांगलाच वादात सापडला होता. या शोवर लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यावर तो बंद करण्यात आला होता.