Join us

Bigg Boss 15 Finale: सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज गिल ढसाढसा रडली, सलमानलाही अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:07 AM

Bigg Boss 15 Finale: बिग बॉस 15च्या फिनालेमध्ये एक इमोशनल क्षणही पाहायला मिळाला. शहनाज गिल बिग बॉसच्या स्टेजवर आली आणि सगळंच वातावरण भावुक झालं...

Bigg Boss 15 Finale: बिग बॉस 15च्या फिनालेमध्ये एक इमोशनल क्षणही पाहायला मिळाला. शहनाज गिल बिग बॉसच्या स्टेजवर आली आणि सगळंच वातावरण भावुक झालं. सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज भावुक झाली. स्टेजवर ती ढसाढसा रडताना दिसली. सलमानच्या गळ्यात पडून ती रडली. तिला रडताना पाहून सलमानही त्याचे अश्रू रोखू शकला नाही. काही क्षण तो सुद्धा भावुक झाला.

सलमानने शहनाजला सावरलं, तिला धीर दिला. गेले काही दिवस शहनाजसाठी खूप वाईट होते. पण ती आयुष्यात पुढे जातेय, ती खूप पुढे जाईल, असं सलमान म्हणाला.

यानंतर शहनाजने सिद्धार्थला ट्रिब्युट देत परफॉर्मन्स केला. बिग बॉसमध्येच  सिद्धार्थ व शहनाज पहिल्यांदा भेटले होते. याच शोमध्ये दोघांचं नातं इतकं पुढे गेलं होतं की या जोडीला चाहत्यांनी सिडनाज हे नाव दिलं होतं. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात  सिद्धार्थचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आणि ही जोडी दुभंगली. शहनाज एकटी पडली.बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ व शहनाज लवकरच लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. सिद्धार्थच्या निधनाच्या धक्क्यातून सावरायला शहनाजला बरेच दिवस लागले. अद्यापही ती या धक्क्यातून सावरलेली नाहीये.

टॅग्स :बिग बॉस