‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) हा शो सुरू झालाये. टीव्हीचा सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो अशी ओळख असलेल्या या शोमध्ये एकीकडे घरात राहणारे सदस्य आहेत आणि दुसरीकडे घराबाहेर जंगल एरियात राहणारे सदस्य आहेत. बिग बॉस ओटीटीमधून आलेले शमिता शेट्टी (Shamita Shetty), प्रतिक सहजपाल, निशांत भट हे तीन सदस्य बिग बॉसच्या अलिशान घरात मुक्कामाला आहेत तर उर्वरित सदस्य बिग बॉसच्या जंगलाच्या थीमवर बनवलेल्या एरियात राहत आहेत. तूर्तास हा शो चर्चेत आला आहे तो शमिता शेट्टी आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांच्यामुळे. होय, एका टास्कनंतर निशांत भटशी बोलताना करणने शमिताला ‘आन्टी’ म्हणत डिवचलं. करणने शमिताला आन्टी म्हणणं अनेकांना आवडलं नाही. मग काय अनेकांनी करण कुंद्राचा क्लास घेतला. आता शमिताची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shett) यांनीही करण कुंद्राला फैलावर घेतलं आहे.
सोशल मीडियावरच्या एका युजरने सुनंदा शेट्टी यांचं एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये सुनंदा यांनी करण कुंद्राची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.‘शमिता कोणत्या अँगलने करण कुंद्राला आन्टी दिसते? एज शेमिंग आणि फिजिकल अटॅक खपवून घेतला जाणार नाही. यावर कारवाई करत असे प्रकार ताबडतोब थांबवायला हवेत,’ अशा आशयाचं ट्विट सुनंदा यांनी केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये सुनंदा यांनी शोचा होस्ट सलमान खान यालाही टॅग केलं आहे. कुशाल टंडनही बरसलाअभिनेता कुशाल टंडन यानेही शमिताला आन्टी म्हणणा-या करण कुंद्राचा क्लास घेतला. अबे करण कुंद्रा, तू जनानी है. शमिता को एज शेम कर रहा है? और ब्रो तुम खुद कितने साल के हो? 37 साल के. पगले, गेट वेल सून..., असं ट्विट कुशाल टंडनने केलं. अर्थात नंतर कुशालने हे ट्विट डिलीटही केलं.