‘बिग बॉस’च्या घरात अनेक प्रेमकहाण्या फुलल्या. काही तिथेच संपल्या तर काही घराबाहेरही चर्चेत राहिल्या. सध्या ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) अशीच एक लव्हस्टोरी हळूहळू फुलताना दिसतेय. ती म्हणजे, तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची लव्हस्टोरी. होय, दोघेही स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी झाले होते. हळूहळू दोघांत मैत्री झाली आणि आता दोघं कदाचित एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण प्रेक्षकांचे मानाल तर ते करण व तेजस्वीचा रोमॅन्टिक अँगल पाहून वैतागले आहेत. किमान सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांवरून तरी हेच दिसतंय.‘बिग बॉस’मध्ये दरवर्षी अनेक जोड्या आपल्या रोमान्सने प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण यावर्षी सीन थोडा उलटा आहे. होय, मेकर्सच्या लाख प्रयत्नांनंतरही करण व तेजस्वीची केमिस्ट्री लोकांना आवडलेली नाही. लोकांना ही लव्हस्टोरी सुरूवातीपासूनच ‘फेक’ वाटतेय.
ताज्या एपिसोडमध्ये करण कुंद्रा तेजस्वीला एक बे्रसलेट गिफ्ट करताना दिसला. याचा प्रोमोही रिलीज केला गेला होता. पण यावर पे्रक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी हा लव्ह अँगल फेक व बोरिंग असल्याच्या कमेंट्स केल्यात.
आमच्यावर अशी बनावटी लव्हस्टोरी लादू नका, अशी कमेंट एका युजरने केली. कलर्स तुम्ही विनाकारण या दोघांचा रोमान्स दाखवून आम्हाला का छळतायं? असा सवाल एका युजरने केला. तेजस्वी आणि करण या बनावटी प्रेमापोटी गेम विसरलेत, अशी तक्रार एका युजरने केली.तेजस्वी व करणच्या लव्हस्टोरीच्या पार्श्वभूमीवर व्हिजे एंडीला दिलेल्या मुलाखतीत अलीकडे डोनल बिष्टने अनेक सवाल उपस्थित केले होते. ‘करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली, सिम्बा नागपाल आणि अकासा सिंग यांना बिग बॉसकडून सतत कन्फेशन रूममध्ये बोलवले जात होते. बाहेर आल्यावर बिग बॉस काय म्हणाले असं विचारल्यावर पर्सनल इश्यू होता, असं म्हणून ते बोलायचं टाळायचे,’असे डोनल म्हणाली होती. डोनल बिष्ट ही सुद्धा ‘बिग बॉस 15’ची स्पर्धक होती. मात्र दोनच आठवड्यात ती शोमधून बाद झाली होती.