Bigg Boss 15 : मीच भित्रा होतो, मी तिला स्वीकारलं नाही..., राखी सावंतचा पती रितेश दोन वर्षानंतर बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:17 AM2021-11-28T10:17:56+5:302021-11-28T10:21:22+5:30
Bigg Boss 15 : हाच तो राखी सावंतचा नवरा; गेल्या दोन वर्षांपासून राखी सावंतचा पती दिसतो कसा? काय करतो? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण अखेर राखीचा पती सर्वांसमोर आलाच.
सध्या ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) हा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये तीन वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. होय, रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि ड्रामा क्वीन राखी सावंत ( Rakhi Sawant) या तिघी बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. राखीसोबत तिचा पती रितेश देखील ‘बिग बॉस’च्या घरात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर तो सुद्धा बिग बॉसच्या घरात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राखी सावंतचा पती दिसतो कसा? काय करतो? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. राखीने अचानक लग्नाची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्याचवेळी त्याचा चेहरा मात्र जगापासून लपवून ठेवला होता. अनेकांना राखीचं लग्न, तिचा पती हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता. पण अखेर राखीचा पती सर्वांसमोर आलाच.
वीकेंड का वार एपिसोडमध्ये राखीने आपल्या पतीची सलमानशी ओळख करून दिली. रितेशला बघताच, आत्तापर्यंत कुठे होतास? असा सवाल सलमाननं केला.
यावर रितेशने स्वत:बद्दल अनेक खुलासे केलेत.
मी एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे. मी बिहारचा आहे आणि सध्या बेल्जियमला राहतो. मी सर्वांना सांगू इच्छितो की, राखी काहीही खोटं बोललेली नाही. ती जे काही बोलली ते 100 टक्के खरं होतं. मी राखीला स्वीकारलं नव्हतं, हा माझा खुजेपणा होता. मी भित्रा होतो, म्हणून मी जगासमोर आलो नाही. मी बिझेनसमध्ये बिझी असल्यामुळे जगासमोर आलो नव्हतो. माझे फोटो पब्लिक करू नको, असं मी राखीला म्हणालो होतो आणि तिनं ते मान्य केलं. लोकांनी यासाठी तिला नको ते म्हटलं. तिला अगदी खोटारडी ठरवलं. बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये ती रडली, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हाच, बिग बॉसने मला बोलवलं तर मी नक्की जाणार, मी लोकांसमोर येणार आणि राखी माझी बायको आहे,हे जगाला सांगणार असं मी ठरवलं होतं. राखी एक अनमोल रत्न आहे. तिची किंमत मला फार उशीरा कळली. ती एक प्रामाणिक व्यक्ती आहे. तिचं मन पाण्यासारखं स्वच्छ आहे, असं रितेश म्हणाला.
अशी सुरू झाली होती राखी व रितेशची लव्हस्टोरी
रितेशने काही वर्षांपूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा त्याच्या पीएने त्याला राखीचा नंबर दिला आणि त्यानंतर त्याने राखीला फोन केला. रितेशने सांगितले की, ‘माझ्या खासगी आयुष्यात मी काही समस्यांचा सामना करत होतो. तेव्हा मला काही गोष्टी अशा व्यक्तीशी बोलायच्या होत्या जो माझ्या फिल्डमधला नसेल, म्हणून मी राखीला हाय मेसेज केला होता. पण तिने मला थेट ब्लॉकच केलं.
त्यानंतर मी तिला दुसºया नंबरवरून मेसेज केला आणि तेव्हा राखीने त्याला रिप्लाय दिला आणि इथून दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि मग प्रेम.