राखी सावंत (Rakhi Sawant) व तिचा पती रितेश ( Ritesh ) यांच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) भलेही काही ‘रौनक’ आली असली तरी रितेशची वागणूक बिग बॉसच्या घरातील काही लोकांना खटकू लागली आहे. होय, रितेश असा काही वागला की, तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash ) असुरक्षित वाटू लागलं आहे. होय, करण कुंद्राजवळ तिने रितेशबद्दल तक्रार केली. तेजस्वीनं जे काही सांगितलं ते ऐकून करणलाही धक्का बसला.
अलीकडच्या एपिसोडमध्ये तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा बेडरूम एरियामध्ये बसलेले दिसते. यावेळी तेजस्वीने करणकडे रितेशबद्दल तक्रार करते. ‘तो जीजा (रितेश) पहिल्या दिवशी आला तेव्हा माझ्याशी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करत होता, माझ्या सारखा जवळ येत होता. तेव्हा प्रतीक सुद्धा किचनमध्ये होता. त्याच्याही हे लक्षात आलं होतं. तेजस्वी, तुला कधीही जीजूपासून काही त्रास जाणवला वा असुरक्षित वाटलं तर मला लगेच सांग, असं प्रतीक मला म्हणाला होता. तो जीजू विचित्र वागत होता. त्याची बॉडी लँवेजही योग्य नव्हती. बोलताना तो माझा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता. मग हेच लोक कल्चर आणि संस्काराच्या गोष्टी करतात,’असं तेजस्वी करणला सांगते. ते ऐकून करणही हैराण होतो.
बिचुकलेलाही घाबरली...तेजस्वी केवळ रितेशमुळेच घाबरलेली नाही तर अभिजीत बिचुकलेमुळेही ( Abhijit Bichukale) तिला घरात असुरक्षित वाटू लागलं आहे. अभिजीत बायकांचा राग करतो आणि होमोफोबिक आहे. म्हणून मला त्याचीही भीती वाटते. म्हणून मी रितेश आणि अभिजीतपासून सध्या जरा दूरच राहते, असे तेजस्वी म्हणते.