बिग बॉसच्या १५ व्या सीझनचा पहिला विकेंड का वार दमदार होणार आहे. विकेंड का वारचे काही प्रोमो समोर आले आहेत. (Bigg Boss 15) ज्यात सलमान खान, प्रतीक सहजपालची शाळा घेताना दिसणार आहे. यासोबतच आणखी एक नवीन प्रोमोदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत शोमधील पाहुणे सलमान खानच्या सुरात सूर मिसळवताना दिसत आहे. ही पाहुणी म्हणजे दुसरी कोणी नाही तर श्रीलंकाचे व्हायरल गाणे मानिक मांगे हिते गायलेली गायिका योहानी डिलोका डी सिल्वा. मानिके मांगे हिथे (Manike Maghe Hithe) या गाण्याबद्दल सांगायचे तर हे श्रीलंकन गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या गाण्यावर सामान्य लोकांपासून अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षितदेखील या व्हायरल गाण्यावर थिरकताना दिसले होते.
कलर्सवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळते आहे की बिग बॉस सीझन १५ शोमध्ये योहानी डिलोका डीसिल्वाने हजेरी लावली. या शोचा सूत्रनिवेदक सलमान खान याच्यासोबत ती गाताना दिसत आहे. योहानी त्याला तिचे प्रसिद्ध मनिके मागे हिथे हे गाणे शिकवताना दिसते आहे. सलमान योहानीच्या मागोमाग हे गाणे म्हणतो आहे. मात्र अनेक शब्द उच्चारण्यात त्याला अडचण येत आहे. पहिल्या दोन ओळी सलमान खान सहजतेने बोलताना दिसते आहे. तिसरी ओळ सलमानला समजली नाही आणि त्यावर तो म्हणाला श्रीदेवी. सलमान आणि योहानीचा हा मजेशीर प्रोमो पाहून अंदाज येतो की हा विकेंडचा वार मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.