Bigg Boss 15 : ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. साहजिकच प्रत्येक स्पर्धक फिनालेमधील आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात बिग बॉस 15 मध्ये अनेक राडे झालेत. रश्मी व देवोलिनाच्या मैत्रीत फूट पडली, उमर व तेजस्वीच्या मैत्रीही तुटताना दिसली. बिचुकलेने देवोलिनाला किस मागितला, तो एक अंकही गाजला. मग काय, वीकेंडला सलमान खान (Salman Khan) आला आणि त्यानं सर्वांचा हिशेब चुकता केला. या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानच्या निशाण्यावर आला तो राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेश (Ritesh).
गेल्या आठवडाभर रितेशनं राखीला दिलेली वाईट वागणूक पाहून सलमान चांगलाच भडकला. इतका की, त्याने रितेशला थेट धमकीच दिली. यानंतर बिग बॉसच्या घरात वा घराबाहेर राखीसोबत असा वागलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, अशा शब्दांत त्याने रितेशला सुनावलं.
तू स्वत:ला कोण समजतोस? आज लोक तुला ओळखत असतील तर ते राखीमुळे ओळखतात, इथून सलमानने सुरूवात केली. राखी, तू याचं वागणं का सहन करतेस? असा प्रश्न सलमानने राखीला केला. यावर, तो मला कायमचं सोडून दिली, हे भीती वाटते, असं राखी म्हणाली आणि तिचं ते उत्तर ऐकून ‘तू राखी सावंत आहेस यार, का सहन करतेस. तो सोडून जाईल म्हणून तू सहन करत राहशील? यापुढे रितेश तुझ्यासोबत असा वागलाच तर फक्त मला एक फोन कर,’असं राखीला म्हणतो.रितेश, तू आज तिच्याशी असभ्यपणे वागतो आहेस, उद्या तिच्यासोबत हिंसाचार करशील. आधीही तूच हेच केलं आहेस. पण आधी तू वाचला असशील, आता वाचणार नाही. राखीसोबत काहीही चुकीचं केल्यास, संपूर्ण इंडस्ट्री तिच्यासोबत उभी राहिलं. संपूर्ण देश तिच्या पाठीशी उभा राहिलं. मी हे इथे बोलू इच्छित नव्हतो. पण तू मला त्यासाठी भाग पाडलंस, असं सलमान म्हणाला.
पहिली पत्नी सिग्ना प्रिया हिने काही दिवसांपूर्वीच रितेशवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. रितेशने मला सलग चार तास बेल्टनं मारलं होतं. माझ्या वडिलांनी रितेशविरूद्ध गुन्हाही दाखल केला होता, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.