OH NO!! ‘BIGG BOSS 15’च्या घरात थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:33 PM2021-10-05T16:33:48+5:302021-10-05T16:34:25+5:30
Bigg Boss 15 : होय, तेजस्वी प्रकाश व विधी पंड्या यांच्यामुळे बिग बॉसच्या घरात आग लागणार होती. सुदैवाने असं काहीही घडलं नाही.
कलर्सवरचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) सुरू होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही तोच, या शोची जोरदार चर्चा आहेत. पहिल्याच दिवशी बिग बॉसमध्ये एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. होय, तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व विधी पंड्या (Vidhi Pandya) यांच्यामुळे बिग बॉसच्या घरात आग लागणार होती. सुदैवाने असं काहीही घडलं नाही. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ( Major accident averted, fire broke out in BB15 house)
तर विधी व तेजस्वी दोघींनी बिग बॉसच्या जंगल एरियातील किचनमध्ये जेवण बनवत होत्या. यावेळी खास तडक्यासाठी वापरल्या जाणा-या पातेल्यातील तेलामुळे त्या भांड्यानं पेट घेतला. विधीने हातात पातेलं पकडलं होतं आणि पातेल्यातील तेलानं पेट घेतला होता. तिनं लगेच ते जळतं पातेलं बेसिनमधील पाण्यानं भरलेल्या कुकरमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. पाण्यानं आग विझेल, असा दोघींचा अंदाज होता. पण पातेलं सिंकमध्ये टाकताच, आगीनं आणखी पेट घेतला.
Vidhi pandya and Tejasswi prakash 😂 🤍.#BiggBoss15#TejasswiPrakashpic.twitter.com/bWbaRh1Til
— ϻⓐHέⓢ𝐡 ☠️ (@sevenshotts) October 4, 2021
क्षणभर विधी व तेजस्वी दोघीही घाबरल्या. अर्थात दुस-याच क्षणाला आग विझली. आग विझल्याचं पाहून दोघींनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
या घटनेनंतर तेजस्वी प्रचंड घाबरलेली दिसली. आग पाहून आता अख्खा सेट जळणार, असं क्षणभर मला वाटलं होतं, असं ती विधीला म्हणाली.आग पसरली असती तर बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा सेट जळून खाक झाला असता आणि यामुळे सीझन सुरू होताच सर्वांना घरी जावं लागलं असतं, असंही गमतीगमतीत ती बोलली.
बिग बॉस 15 मध्ये एकापेक्षा एक भारी स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. यात जय भानुशाली, विशाल कोटियान, तेजस्वी प्रकाश, साहिल श्रॉफ, करण कुंद्रा, इशान सहगल, अफसाना खान, सिंबा नागपाल, डोनल बिष्ट, अकसा सिंह, आसिम रियायजचा भाऊ उमर रियाज, विधी पंड्या, शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल, मीशा अय्यर,निशांत भट या स्पर्धकांचा समावेश आहे.