छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस (bigg boss). यंदा या शोचं १५ वं पर्व सुरु घरातील स्पर्धकांमध्ये होणाऱ्या वादविवाद, मतभेद आणि भांडणं यामुळे ते गाजत आहे. इतकंच नाही तर या पर्वात सर्वाधिक वेळा टास्क रद्द करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. या घरामध्ये सध्या दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. एका गटातील स्पर्धक सतत या ना त्या कारणावरुन वाद निर्माण करतात. तर दुसऱ्या गटातील अनेकांची एकमेकांसोबत छान गट्टी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), करण कुंद्रा (karan kundra), राखी सावंत (rakhi sawant), देवोलीना भट्टाचार्जी, शमिता शेट्टी (shamita shetty) आणि अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) हे काही मोजके स्पर्धक सातत्याने चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबाविषयी सांगताना दिसत आहे.
तेजस्वी प्रकाशने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश तिच्या आई-वडिलांच्या रिलेशविषयी बोलताना दिसत आहे. लग्नानंतर फक्त एका आठवड्यामध्येच तिचे वडील आईला सोडून गेले होते. इतकंच नाही तर ते तब्बल एक- दीड वर्षांनी परत आले. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal) आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांना तिच्या फॅमिलीबद्दल सांगत आहे.
"ज्यावेळी माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं तेव्हा लग्नाच्या एका आठवड्यानंतर लगेचच माझे वडील दुबईला रवाना झाले. त्यांचं अरेंज मॅरेंज होतं. ते गेल्यानंतर जवळपास दिड वर्ष परत आलेच नाही. अनेकांनी आईला सांगितलं की ते तुला फसवूण गेलेत. तो परत येणार नाही. त्यामुळे या चर्चांमुळे आईला खूप टेन्शन यायचं. पण, ते एकमेकांना पत्र लिहायचे. त्यात कोणत्या वेळी PCO वरुन बोलायचं हे लिहिलेलं असायचं. त्यावेळी ISD कॉल महाग होते त्यामुळे पैशांचंही टेन्शन होतं", असं तेजस्वी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जवळपास दीड वर्षांनंतर वडिलांनी दुबईमध्ये सगळं सेटल केलं आणि मग भारतात परत आले. चांगलं घर घेतलं. गाडी खरेदी केली आणि त्यानंतर आईला सोबत घेऊन गेले."