बिग बॉसचा १५वा सीझन खूप मनोरंजन करत आहे. घरातील उपस्थित स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येत आहेत. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरात नवीन वाद पहायला मिळत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नवीन टास्क सुरू आहे. ज्यात जंगलवासीयांना बिग बॉसने तीन ग्रुपमध्ये विभागले आणि जो टास्क जिंकेल त्याला मुख्य घरात एन्ट्री मिळणार आहे. टास्कचे नाव आहे 'जहर का कहर' ज्यात जंगलचे स्पर्धक तीन टीममध्ये म्हणजे टायगर, डियर आणि प्लांट टीममध्ये विभागले गेले. (Bigg Boss 15)
टीम टाइगरमध्ये जय भानुशाली, तेजस्वी प्रकाश, विशाल कोटियान आणि अकाशा सिंग, तर टीम डियरमध्ये ईशान सहगल, डोनल बिष्ट, अफसाना खान व सिम्बा नागपाल यांचा समावेश आहे. टीम प्लांटमध्ये करण कुंद्रा, उमर रियाज, मायशा अय्य आणि विधि पांड्या यांचा समावेश आहे. या टास्कची संचालक शमिता शेट्टी आहे. जी सध्या घराची कॅप्टनदेखील आहे. निशांत भट आणि प्रतीक सहजपालला टास्कमध्ये डॉक्टरांची भूमिका दिली आहे.
टास्कमध्ये सुरूवातीला पहायला मिळत आहे की, कसे विशाल शमितासोबत प्लान तयार केला. विशाल शमिताला सांगितले की जर त्यांची टीम मुख्य घरात आली तर जय, विशाल, अकाशा आणि तेजस्वी त्यांच्या बाजूने असतील आणि घरात त्यांचा मोठा हात असणार. मग प्रतीक आणि निशांत फक्त हे दोन लोकच राहतील. या कारणामुळे शमिता, टीम टायगरला समर्थन देण्याचा निर्णय घेते. कारण तिचा विशालवर विश्वास आहे आणि त्याच्यासोबत चांगली मैत्रीदेखील आहे. पहिल्या राउंडमध्ये टायगर टीम जिंकते आणि ते टीम डियरमधून सिंबाला हटवतात. कारण ते त्यांना मजबूत दावेदार मानतात. दुसऱ्या फेरीत टीम प्लान्ट टास्क जिंकते. तेव्हा शमिता चुकीचा निर्णय घेते आणि ती सांगते की हा चुकीचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी सांगितले की यात कोणीच जिंकले नाही. या गोष्टीमुळे टीम प्लांट नाराज झाले. कारण त्यांना माहित आहे की ते जिंकले असते मात्र शमिताने त्यांना आधीच हरविण्याचा निर्णय घेतलेला असतो.अखेर, शमिता टीम टायगरलाच विजेती म्हणून घोषित करते. अशारितीने आता जे सदस्य मुख्य बिग बॉस १५च्या घरात प्रवेश घेतील ते ४ लोक असतील. विशालचा मास्टरस्ट्रोक प्लान त्यांच्यासाठी उपयोगी ठरतो आणि तो, जय अकाशा आणि तेजस्वी मुख्य बिग बॉसच्या घरातील सदस्य बनणार आहेत. आता हे चारही सदस्य बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांसोबत खेळताना दिसतील.