‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) ताज्या एपिसोडमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. सिम्बा नागपाल (Simba Nagpal) आणि उमर रियाज (Umar Riaz ) एकमेकांशी असे काही भिडलेत की टीव्हीवर पाहतानाही धडकी भरावी. सिम्बाने उमरला पूलमध्ये धक्का दिला. ऐरवी शांत राहणारा आणि कोणाच्याही अध्यात मध्यात न पडणा-या सिम्बाचा हा अॅग्रेसिव्ह स्वभाव पाहून चाहतेही अवाक् झालेत. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले.टास्कदरम्यान सिम्बाने उमर रियाजला ‘अतिरेकी’ संबोधल्यामुळे तर चाहत्यांना संताप अनावर झाला. ट्विटरवर ‘जस्टिस फॉर उमर रियाज’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. अनेक सेलिब्रिटींनीही उमरला सपोर्ट करताना सिम्बावर तीव्र शब्दांत टीका केली.
उमर रियाजचा भाऊ आसिम रियाज यानेही एक ट्विट करत भावाला सपोर्ट केला. ‘तुला दु:ख होईल. वेळ लागेल. तुला आणखी निष्ठेनं खेळावं लागेलं, आणखी शक्ती आणि संयम लागेल. विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि त्याग करावा लागेल. पण मी वचन देतो की, तू तुझा मुक्कामाच्या ठिकाणी नक्की पोहोचशील. याचं चांगलं फळ तुला मिळेलं,’ असं ट्विट रियाजने केलं.
हिमांशी खुराणाही बरसली...‘चाहे सपोर्ट करो या नहीं करो, यहां गलत सही लगता है और सही गलत.. कितना भी बोलो कुछ नहीं होने वाला.. लेकिन किसी को बोली हुई बात हमेशा उसका पीछा करती है. लेकिन हर साल यहां रूल बदल जाते हैं. आतंकवादी शब्द का इस्तेमाल एक आदमी के लिए आप कर रहे हैं? लेकिन फिर भी सिंबा ही सही हो,’असं ट्विट तिने केलं.
चाहत्यांनी सिम्बाला बाहेर काढा, गेल्या सीझनमध्ये विकासला तुम्ही शो बाहेर काढलं होतं, त्यानं अर्शीला पूलमध्ये ठकल्यावर विकास बाहेर गेला होता. नियम सर्वांना सारखे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.
सिम्बा नागपालने 2018 साली एमटीव्ही स्प्लिटविला 11 मध्ये भाग घेतला होता. या शोदरम्यान संयुक्ता हेगडे व मोनल जागतानीसोबत त्याचं नावं जोडलं गेलं होतं. पण सिम्बाने या दोघीही आपल्या चांगल्या मैत्रिणी असल्याचं म्हटलं होतं. रोडीज् दरम्यान सिम्बाने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, मी इंटोवर्ट व्यक्ति आहे. माझे वडील आई आणि माझ्यासोबत खूप वाईट वागतं. लहानपणी वडील मला काठीने मारायचे. वडिलांच्या याच वागणुकीने मला आतून स्ट्राँग बनवलं. कदाचित त्याचमुळे मी नॅशनल लेव्हलचा बॉक्सर बनलो.