बिग बॉस 15 चा (Bigg Boss 15) फिनाले दोन आठवड्यांवर आला आहे. अशात घरातील सर्व सदस्य फिनाले वीकमध्ये जाण्यासाठी व चाहत्यांच्या मतासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. पण आठवडाभराचा हिशेब ‘वीकेंड का वार’मध्ये चुकता करावा लागतोच. काल शनिवारी सलमान खान (Salman Khan) ‘वीकेंड का वार’मध्ये आला आणि त्याने राखी सावंतचा (Rakhi Sawant) चांगलाच क्लास घेतला.
सलमानने तेजस्वी, प्रतिक सहजपाल आणि राखी अशा तिघांची शाळा घेतली. पण राखीवर तो जरा जास्तच बरसला. सलमानने राखीच्या काही क्लिप्स दाखवत, तिला धारेवर धरलं.
घरात होणा-या सर्व गोष्टी तुला आधीच कशा कळतात. बिग बॉसच्या मेकर्सलाही माहित नसतात, त्या गोष्टी तुला आधीच कशा माहित होतात. तेजस्वी फिनालेमध्ये गेली तर तुझ्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, असं तू करणला म्हणाली. तुला हे कसं माहित? अशा शब्दांत सलमानने सुरूवात केली. जेव्हापासून तू फिनाले वीकमध्ये पोहोचली आहेस, तेव्हापासून तुझ्याकडे करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे स्वत:कडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तू हे सगळं करत आहेत. जे खरंच खूप बोरिंग आहेस. दुस-यांवर लक्ष देण्याऐवजी स्वत:वर लक्ष दे. तू घरात आली होतीस तेव्हा लोकांना एंटरटेन करत होतीस. पण आता तू कंटाळवण्या गोष्टी करत आहेत, असं सलमान म्हणाला.
बिग बॉस 15 च्या फिनालेला आता केवळ दोन आठवडे राहिले आहेत. काही दिवसांत शोमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळाले. यंदाच्या सीझनला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा टीआरपी कमालीचा घसरला होता. टीआरपी वाढवण्यासाठी अनेक वाईल्ड कार्ड एन्ट्री घरात आल्यात.