‘बिग बॉस 15’ या शोची काल सांगता झाली. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ‘बिग बॉस 15’ची विजेती (Bigg Boss 15 winner) ठरली. पण तिच्या विजयासोबत सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं. होय, सोशल मीडियावर तेजस्वीच्या विजयावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जातंय. अगदी गौहर खान, करण नाथ आणि काम्या पंजाबी सारख्या सेलिब्रिटींनीही तेजस्वीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
तेजस्वी प्रकाश व प्रतिक सहजपाल (Pratik Sehajpal) असे दोघे टॉप 2मध्ये आल्यानंतर बिग बॉसची ट्रॉफी फक्त प्रतिकचं जिंकणार, याची चाहत्यांना खात्री होती. पण सलमानने विनर म्हणून तेजस्वी प्रकाशच्या नावाची घोषणा केली आणि स्टुडिओतही क्षणभर शांतता पसरली होती. तेजस्वी जिंकलीच कशी? असा प्रश्न अनेकांना पडला होता. सोशल मीयिावर लगेच याचे पडसाद उमटले. अनेकांनी प्रतिकवर अन्याय झाल्याचं मत मांडत कलर्स वाहिनीवर टीका केली.प्रतिकने प्रत्येक टास्कमध्ये 100 टक्के योगदान दिलं. चुकीचं वागणाऱ्यांविरूद्ध त्याने नेहमी स्टँड घेतला. तूच विनर आहेस आणि अख्ख्या जगाने हे पाहिलं आहे, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. अनेकांनी हा शो फिक्स्ड असल्याचा आरोपही केला.
गौहर खानचा टोमणागौहर खाननं एक ट्विट करत तेजस्वीच्या विजयावर नाराजी व्यक्त केली. ‘बिग बॉस 15 च्या विजेत्याचं नाव घोषित होताच स्टुडिओमध्ये शांतता पसरली होती. क्षणभर लोकांचा विश्वास बसेना. यातच सगळं काही आलं. बिग बॉस 15 चा फक्त एक विनर होता आणि जगानं त्याला पाहिलं, तो म्हणजे प्रतिक सहजपाल. प्रतिक तू सर्वांची मनं जिंकलीस. बिग बॉसच्या घरात गेलेला प्रत्येक पाहुणा तुझा चाहता आहे. लोकांना तू आवडतोस,’ असं ट्विट गौहर खानने केलं.
तूच माझ्यासाठी विनर- काम्या पंजाबीकाम्या पंजाबी हिनेही प्रतिकसाठी ट्विट केलं. प्रतिक सहजपाल तूच माझ्यासाठी विनर आहेस आणि राहशील. तू खूप चांगला खेळलास. तुला शुभेच्छा, असं ट्विट काम्यानं केलं.