‘बिग बॉस 16’ची (Bigg Boss 16 ) धमाकेदार सुरूवात झालीये आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीलाच घरात राडे सुरू झाले आहेत. होय, बिग बॉसच्या घरात जमलेल्या स्पर्धकांचे रोज नवे वाद पाहायला मिळत आहेत. घरात दोन गट पडले आहेत. सोशल मीडिया स्टार्स विरूद्ध सेलिब्रिटी अशा या दोन गटात दिवसागणिक तणाव वाढत असल्याचंही चित्र आहे. नुकताच बिग बॉस 16 चा एक प्रोमो रिलीज करण्यात आला. यात गोरी व सृजिता यांच्यात किचनमध्ये भांडण सुरू झालेलं दिसतंय. या भांडणात सुंबलही उडी घेते आणि यानंतर सगळेच गोरीवर उलटतात. आता नेमकं काय झालं ते जाणून घेऊ या.
तर कॅप्टन झालेल्या गौतमने घरातील सर्व कामे वेगवगेळ्या ग्रुपमध्ये वाटून दिली आहेत. कॅप्टनने श्रीजीता आणि सुम्बुल तौकीरला किचनचं काम दिलं आहे. यादरम्यान श्रीजीता आणि गौरी नागोरी यांच्यात वाद होतो. जेवताना गोरीने पुन्हा भाजी मागते आणि श्रीजीता चिडते. ती तिला भाजी देण्यास नकार देते आणि यानंतर दोघींमध्ये प्रचंड वादविवाद सुरू होतो. वाद वाढत असल्याचं बघून निम्रीतन तिला भाजी आणून वाढते. यादरम्यान गौरी किचनमध्ये येऊन उभी राहते आणि ती त्याठिकाणी ठेवलेल्या टॉवेलला हात पुसू लागते. त्यावर श्रीजीता पुन्हा तिला तसं न करण्यास बजावते. यामुळे गौरी चिडते आणि पुन्हा त्या दोघींमध्ये भांडण सुरु होतं. या वादात सुंबुलही सहभागी होते. हा वाद इतका वाढतो की स्पर्धक रागाच्या भरात एकमेकांचं स्टँडर्ड आणि क्लासदेखील काढतात. या भांडणात एमसी स्टॅन गौरीची बाजू घेतो. ती गावातली आहे म्हणून सगळे तिच्यावर चढतात, असं तो म्हणतो. तर घरातले सेलिब्रेटी सदस्य श्रीजीताची बाजू घेतात.
बिग बॉसने दिली शिक्षाघरात एकमेकांचा स्टँडर्ड, त्यांचा क्लास काढणं बिग बॉसला आवडत नाही. बिग बॉस लगेच कॅप्टन गौतमला कन्फेशन रूममध्ये बोलतवता आणि यानंतर, बिग बॉस गौतमला शिक्षा म्हणून एलिमिनेशनसाठी 4 स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगतात. गौतमने टीना दत्ता, श्रीजीता, एमसी स्टॅन आणि गौरी नागोरीला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करतो बिग बॉस आपल्याकडून शालिन भनौतचंदेखील नाव सुचवतात. अशाप्रकारे या आठवड्याला घरातून बाहेर जाण्यासाठी टीना दत्ता, श्रीजीता, एमसी स्टॅन, गौरी नागोरी आणि शालिन भनौत असे एकूण पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.