Join us

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’मध्ये मोठा ट्विस्ट, अर्ध्या रात्री अर्चना गौतमची हकालपट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 15:56 IST

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’बद्दल एक शॉकिंग बातमी ऐकायला मिळतेय. होय, बिग बॉसने अर्चना गौतमची  घरातून हकालपट्टी केली आहे.

बिग बॉस 16’बद्दल ( Bigg Boss 16) एक शॉकिंग बातमी ऐकायला मिळतेय. होय, बिग बॉसने अर्चना गौतमची ( Archana Gautam) घरातून हकालपट्टी केली आहे. अर्चनाला बिग बॉसने घरातून बाहेर काढल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. साऊथची सनी लिओनी म्हणून ओळखली जाणारी अर्चना गौतम ‘बिग बॉस 16’ची सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट आहे. बिग बॉसच्या घरात ती सर्वधिक अ‍ॅक्टिव्ह दिसते. मात्र ‘बिग बॉस 16’बद्दल बित्तंमबातमी देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या ट्विटर हँडलने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसने अर्चनाला घरातून बाहेर केलं आहे. रिपोर्टनुसार, अर्चना व शिव ठाकरे यांच्यात रात्री मोठा राडा झाला आणि यादरम्यान अर्चना फिजिकल झाली. बळाचा वापर करत हिंसक झाल्याने मध्यरात्री 3 च्या सुमारास बिग बॉसने तिला बाहेर काढले. 

अर्चनाची अशा पद्धतीने शोमधून हकालपट्टी झाल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अर्चनाला एंटरटेनमेंट क्वीनचा खिताब देण्यात आला होता. सलमानने सुद्धा तिचं कौतुक केलं होतं. पण यानंतर तिचा गेम बदलला. गेल्या काही दिवसांपासून अर्चना फक्त घरातील सदस्यांशी वाद करताना, जोरजोरात भांडताना दिसतेय. कधी शिव तर कधी प्रियंकासोबत तिचे खटके उडतात. सुंम्बुलसोबतही तिचं जबरदस्त भांडण झालं होतं. अब्दु रोजिक घराचा कॅप्टन बनल्यापासून अर्चना त्याच्यासोबतही वाद घालताना दिसतेय.

‘बिग बॉस 16’ने एक प्रोमो रिलीज केला आहे. यात बिग बॉस घरातील सदस्यांना अब्दुच्या कॅप्टन्सीला नंबर्स देण्यास सांगतात. अर्चना अब्दुला सर्वात कमी नंबर्स देते. अब्दु फक्त झोपलेला असतो, अशी कमेंटही ती करते. यावरून अब्दुच्या बाजूने शिव मैदानात उतरतो आणि मग अर्चना व शिव आपआपसात भिडताना दिसतात. याच टास्कनंतर अर्चनाला घराबाहेर काढण्यात आल्याचं कळतंय. अर्थात यात किती सत्य आहे, हे येणारा एपिसोड पाहूनच आपल्याल कळणार आहे.

टॅग्स :बिग बॉसकलर्सटेलिव्हिजन