Bigg Boss 16 House Photos: छोट्या पडद्यावरचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरला या शोचा ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. ‘बिग बॉस 16’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता आहेच. पण या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नवं काय दिसणार? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. तर आता त्याचेही अपडेट समोर आले आहेत.होय, पहिला मोठा बदल म्हणजे, यावेळी ‘बिग बॉस’ स्वत: शोमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय या सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धक असणार आहेत. इतकंच नाही तर, हे सीझन आणखी एका कारणानं वादळी ठरण्याची शक्यता आहे. होय, बिग बॉसच्या इतिहासात प्रथमच बीबी हाऊसमध्ये चार बेडरूम असणार आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस 16’च्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
‘बिग बॉस’चं घर दरवेळी अनोख्या पद्धतीने, वेगवेगळ्या थीमनुसार सजवण्यात येतं. या सीझनची थीम सर्कस असल्याचं कळतंय. ‘बिग बॉस 16’च्या घराचे जे फोटो समोर आले आहेत, त्यावरूनही हेच दिसतंय.
‘बिग बॉस 16’च्या मेन गेटवर ‘वेलकम टू द स्’ असं लिहिलेलं दिसतंय. घरातील लिव्हिंग रूम प्रचंड प्रशस्त आणि आकर्षक आहे. सर्कस ही थीम असल्यामुळे संपूर्ण घराचा नजारा असाच आहे. इंटिरिअर डिझाईन सर्कस थीमवर बेतलेलं आहे.
बेडरूमचे फोटोही समोर आले आहेत. चर्चा खरी मानाल तर पहिल्यांदा ‘बिग बॉस 16’मध्ये एक दोन नाही तर चार बेडरूम असणार आहेत. याआधीच्या सीझनमध्ये एक मोठ्ठ बेडरूम असायचं आणि याठिकाणी अनेक बेड्सची सोय केलेली असायची. गेल्या सीझनमध्ये डबल व सिंगल बेड्सवरून स्पर्धक भांडताना दिसले होते. यावेळी मेकर्सनी चार बेडरूम बनवले आहेत. पण यावेळीही बेड्सवरून स्पर्धकांमध्ये भांडणं होणार, हे नक्की मानलं जातंय.