गेल्या 1 ऑक्टोबरला ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन (Bigg Boss 16)सुरू झाला. यावेळी बिग बॉसच्या घरात अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. स्वत: बिग बॉस खेळत आहेत. टीव्हीचे अनेक लोकप्रिय चेहरे यावेळी बिग बॉसच्या घरात आहेत. सोशल मीडियावरचे काही लोकप्रिय इन्फ्लुएन्सरही यावेळी घरात पाहायला मिळत आहेत. अर्थात स्पर्धकांचं म्हणाल तर स्पर्धक पुरते गोंधळलेले दिसत आहेत. सुम्बुल तौकीर खान (Sumbul Touqeer ), शालीन भनोट (Shaleen Bhanot ), गौतम विग (Gautam Vig), टीना दत्ता (Tina Datta) या स्पर्धकांकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण तूर्तास तरी सगळेच कन्फ्युज वाटावे, अशा पद्धतीने खेळत आहेत. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघाल तर अनेकांना हा शो ‘बिग बॉस’ कमी अन् ‘स्प्लिट्सविला’ जास्त वाटतोय. होय, पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रेम फुलतांना दिसतंय. या सीझनमध्ये तर जरा अतिच.
होय, सुम्बुल शालीन भनोटच्या मागे पडली आहे. दुसरीकडे शालीनचा टीना दत्तामध्ये गुंतत असल्याचं दिसतंय. टीना मात्र एकीकडे शालीन इशाºयांवर नाचवतेय, दुसरीकडे गौतम विज याच्यासोबतही फ्लर्ट करताना दिसतेय. गौतमही चतूर. तो एकीकडे टीनाला भुलवतोय, दुसरीकडे सौंदर्या शर्मासोबत फ्लर्ट करतोय. पण सौंदर्याचं वेगळंच काही सुरू आहेत. ती एमसी स्टॅनच्या (Soundarya Sharma Mc Stan) मागे वेडी झाली आहे. हे पाहून चाहते फुल्ल कन्फ्युज आहेत.आता सोशल मीडियावरही यावर चर्चा होऊ लागली आहे. बिग बॉसच्या घरात हे नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सुम्बुल शालीन के पिछे, शालीन टीना के पिछे, टीना गौतम के पिछे, गौतम सौंदर्या के पिछे और सौंदर्या एमस स्टॅन के पिछे..., काय सुरू आहे भाई, अशी कमेंट एका युजरने सोशल मीडियावर दिली आहे.काहींनी बिग बॉसच्या घरात कॉलेज ग्रूप असल्याचं म्हटलं आहे.
बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातच शालीन व सुम्बुल यांच्यातील बॉन्डिंग स्ट्राँग होत होती. पण टीनाने आपलं डोकं चालवलं आणि दोघांत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. ती स्वत:च शालीनसोबत फ्लर्ट करू लागली. इतकंच नाही तर गौतमला सुद्धा आपल्या जाळ्यात ती ओढताना दिसतेय.