Bigg Boss 16 First Eviction: बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘आऊट’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:07 AM2022-10-16T11:07:21+5:302022-10-16T11:16:03+5:30
Bigg Boss 16 First Eviction: : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसचं पहिलं एव्हिक्शन झालं.
Bigg Boss 16 First Eviction : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसचं पहिलं एव्हिक्शन झालं. दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरात राग, रूगवे, भांडण, प्रेम असं सगळं काही पाहायला मिळालं आणि अखेर एव्हिक्शनची वेळ येऊन ठेपली. टीना दत्ताची मैत्रिण बनून बिग बॉसच्या घरात आलेली ‘उतरन’ फेम श्रीजिता डे (Sreejita De) हिचा घरातील प्रवास संपुष्टात आला. श्रीजिताला सर्वाधिक कमी मतं मिळाली. घरात पहिल्या आठवड्यात ती फार काही कमाल दाखवू शकली नाही. गेल्या आठवड्यात प्रियंका आणि गोरी यांच्यासोबत तिचं भांडण वगळता, ती फार काही चर्चेत आली नाही. अखेर तिला घराबाहेर व्हावं लागलं. या आठवड्यात घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले होते. यात शालिन, टीना दत्ता, एमसी स्टॅन, गोरी नागोरी आणि श्रीजिता डे यांचा समावेश होता.
घराबाहेर पडताच म्हणाली...
घराबाहेर पडल्यानंतर श्रीजिताने घरातील टीना दत्ता आणि शालीन भनोट यांच्या लव्हस्टोरीबद्दल खुलासा केला. टीना व शालीनची लव्हस्टोरी फेक आहे. घरात टिकून राहण्यासाठी अनेकजण लव्ह कनेक्शन बनवत आहेत. पण लोक इतके मूर्ख नाहीत. टीना व शालीन एकमेकांच्या प्रेमात पडले, हे न समजण्याइतपत कुणीही मूर्ख नाही, असं ती म्हणाली. टीना व शालीन दोघांनाही ठाऊक आहे की, बाहेर त्यांची फॅन फॉलोइंग नाही. त्यामुळे त्यांनी प्रेमाचं नाटक सुरू केलं आहे, असं ती म्हणाली.
श्रीजिता घरातून आऊट झाल्यानंतर आता घरात केवळ 15 सदस्य उरले आहेत. कझाकिस्तानचा अब्दु राजिक हा सध्या घरातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक ठरला आहे.