Join us

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये ‘KISS’वरून राडा! शालीन-सौंदर्याचा ‘ड्रामा’ पाहून चढला गौतमचा पारा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 4:54 PM

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या प्रेमाला उधाणं आलं आहे. होय, लव्ह अँगलचा ड्रामा जोरात आहे. इतका की, यामुळे मोठ मोठ्या मुद्यांवरून नव्हे तर ‘किस’वरून राडे होताना दिसत आहे.

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या प्रेमाला उधाणं आलं आहे. होय, लव्ह अँगलचा ड्रामा जोरात आहे. इतका की, यामुळे मोठ मोठ्या मुद्यांवरून नव्हे तर ‘किस’वरून राडे होताना दिसत आहे. कोण कुणाच्या प्रेमात आहेत, जळफळाट व्हावा म्हणून कोण कुणाला चिडवतोय, हेच कळेनासं झालं आहे. येत्या एपिसोडमध्ये ‘किस’वरून बिग बॉसचं घर पेटणार आहे. यामुळे दोन मित्रांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसेल. आम्ही बोलतोय ते शालीन भनोट   आणि गौतम विगबद्दल.गुरूवारच्या एपिसोडचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात सगळे घराच्या गार्डनमध्ये बसलेले आहेत. याचदरम्यान अचानक शालीन येतो आणि सौंदर्याच्या गालावर किस (Shalin Bhanot kisses Soundarya Sharma) करतो. हे पाहून घराचे सगळे हुटिंग करायला लागतात.

सौंदर्याला किस केल्यानंतर शालीन मस्ती मस्तीत ओरडताना दिसतो. पण गौतम विग आणि टीना दत्ताच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलतात. गौतमचा पारा चढतो. शालीनचं हे कृत्य चीप असल्याचं तो म्हणतो. चीप हा शब्द ऐकताच शालीन संतापतो. मग दोघंही एकमेकांवर तुटून पडतात. टीनाही नाराज होते. ती सुद्धा आपली नाराजी व्यक्त करते. माझा बायॅफ्रेन्ड असं काही करेल तर मला त्रास होईलच, असं ती म्हणते.

यासगळ्यात सौंदर्या मात्र वेगळाच तर्क मांडताना दिसते. ती गौतमवरच उलटते. तू माझा बॉयफ्रेन्ड आहेस, असं वागू नकोस. तू माझा पती आहेस का? असं वागायला? असं ती संतापून म्हणते. आता हे भांडण कुठल्या स्तराला जातं, हे बघूच.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनटिना दत्तासेलिब्रिटीकलर्स