Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16 ) दुसरा वीकेंड का वार जबरदस्त असणार आहे. आज वीकेंड का वारमध्ये सलमान (Salman Khan) कोणावर बरसणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, शालीन भनोट (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Datta ). होय, आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमान टीना व शालीनची पोलखोल करणार आहे. याची झलक तुम्ही प्रोमोमध्ये पाहू शकता.प्रोमोत सुम्बुल तौकीर खानचे (Sumbul Touqeer ) वडील दिसत आहेत. ते आपल्या मुलीला अर्थात सुम्बुलला समजवताना दिसत आहेत.
‘सुम्बुल तू इतक्या निष्पाप मनाची आहेस की, बिग बॉसच्या घरात तुला पाहून मी घाबरलो आहे. बघ, जग कसं आहे बेटा,’असं ते म्हणताना दिसतात. याच प्रोमोमध्ये ते शालीनवर बरसतात. ‘शालीन, ती(सुम्बुल) तुला निष्पाप भावनेने भेटली होती. पण तू काय केलंस. तू माझ्या मुलीचा तमाशा बनवला. तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. सुम्बुल, तुला कळत नाहीये की हे लोक तुझा वापर होत आहे. हे सगळं पाहून मी खूप दु:खी आहे,’असं सुम्बुलचे पापा म्हणतात. ते इथेच थांबत नाहीत तर टीना दत्ताचा सुद्धा क्लास घेतात.
वीकेंड का वारमध्ये सलामन बिग बॉसच्या घरात जाणार आहे. इथे सलमान स्पर्धकांसोबत एक गेम खेळताना दिसणार आहे. यात स्पर्धकांना सांगायचं आहे की, त्यांच्याबद्दल काही गोष्टी कुणी बोलल्या आहेत. सलमान सुम्बुलला सांगतो की, तुझ्याबद्दल कुणीतरी म्हटलंय की, सुम्बुल तुला पसंत करते. यावर सुम्बुल हे टीनाने म्हटलं असावं, असा अंदाज बांधते.यानंतर सुम्बुलचे वडील टीनावरही बरसतात. टीना, मला वाटलं होतं की तू सुम्बुलला मोठ्या बहिणीसारखं सांभाळशील. पण तू काय केलंस? आधी शालीनला तिच्याबद्दल नको ते सांगितलं आणि मग ती कहाणी प्रत्येकाला जाऊन सांगितलं. सुम्बुल, बघ बेटा जसं दिसतं तसं काहीही नसतं...,’असं ते म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून सुम्बुल, शालीन, टीनाचा लव्ह ट्रँगल बघायला मिळतोय.