Join us

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनंतर घरातील या सदस्यानं घराबाहेर पडण्याची व्यक्त केली इच्छा, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 3:37 PM

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मन्नारा खूप इमोशनल दिसत आहे. ती वारंवार घराबाहेर जाण्याचा आग्रह धरत आहे.

बिग बॉस १७ (Bigg Boss 17) सध्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सर्व स्पर्धक आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारच्या एपिसोडमध्ये करवा चौथ स्पेशल दाखवण्यात येणार आहे. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा आपल्या पतीसाठी करवा चौथ उपवास करणार आहेत. अभिनेत्री मन्नारा चोप्राचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मन्नारा रडताना दिसत आहे. घरातील सर्व सदस्य त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मन्नारा म्हणते की बिग बॉस, मला कन्फेशन रूममध्ये बोलवा आणि मला या शोमधून बाहेर पडावे लागेल. मन्नारा खूपच भावूक दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कलर्सने लिहिले - मन्नाराचे डोळे भरून आले आहेत, तिला कोणी दुखावले? हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मन्नाराबद्दल बोलायचे झाले तर ती साऊथची अभिनेत्री आहे. मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण आहे. जेव्हापासून मन्नाराने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे, तेव्हापासून तिने तिच्या बबली शैलीने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. बिग बॉसनेही आपण मन्नाराबाबत पक्षपाती असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मन्नारा आणि मुनव्वर यांच्यात चांगली बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडेसोबतही मन्नाराचे भांडण झाले होते.

शोबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या एपिसोडमध्ये रेशन टास्क होता. यावेळी बिग बॉस सर्व स्पर्धकांवर नाराज झाले. वास्तविक, बिग बॉसमध्ये कोणीही ऐकत नव्हते आणि मधूनमधून बोलत होते. टास्कदरम्यानही बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे बिग बॉसने हे टास्क मध्येच थांबवले होते. खोली क्रमांक १ आणि ३ मध्ये फक्त मूलभूत रेशन मिळाले. त्यामुळे घरात अनेक भांडणे होत होती.

टॅग्स :बिग बॉस