Join us

'जी बॉयफ्रेंडची झाली नाही ती दुसऱ्याची काय होणार' असं मन्रारा म्हणताच भडकली अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 5:35 PM

नुकताच अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात जोरदार भांडण झालं.  त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. या शोच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली होती. नुकताच अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात जोरदार भांडण झालं.  त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात जोरदार वाद झाला. मन्नाराने अंकितावर नेहमी ईशा सोबत राहण्याचा आणि तिच्या मैत्रीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केल्यानं भांडण वाढलं.  ईशाची स्वतःची कोणतीही भूमिका नाही आणि ती तुझा विश्वासघात करेल. जर एखादी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडची होत नसेल तर ती दुसऱ्याची काय होणार? असे म्हणत मन्नारे ईशावर टीका केली.  यावर अंकिता लोखंडे चांगलीच संतापली. तिनं ईशाची बाजू घेतली आणि मन्नाराचे वागणे अयोग्य असल्याचे म्हटलं. वादानंतर मन्नारा ढसाढसा रडू लागली. आता तिला अंकिताशी मैत्री करायची नाही, असं तिनं म्हटलं.

बिग बॉस १७ शोची सुरुवात धमाकेदार झाली आहे. यंदा शोमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्य, अनुराग ढोबाल, जिग्ना वोरा, मुनव्वर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना रईस खान आणि सोनिया बन्सल यांचा समावेश आहे. 

यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये एक नव्हे तर तीन घरांमध्ये सदस्यांची विभागणी केली गेली. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'मधील सदस्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. अंकिता 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्याने चाहत्यांची या पर्वासाठी उत्सुकता वाढली होती. आता अंकिता 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी कोणते डावपेच खेळते, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.   

टॅग्स :अंकिता लोखंडेबॉलिवूडबिग बॉससेलिब्रिटी