Join us

सासूला पटेना सुनेचं वागणं, तरीही आईला जावयाचंच कौतुक; विहीणबाईंच्या आरोपांवर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:17 IST

Ankita lokhande:अंकिताच्या आईने पहिल्यांदाच विकी जैनच्या आईने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि पती विकी जैन (vicky jain) यांच्या नात्यात सध्या अनेक चढउतार येत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचं प्रेम दर्शवणारी ही जोडी बिग बॉसच्या घरात कडाडून भांडत आहेत. त्यांच्या भांडणांमध्ये आता त्यांच्या आईनेही उडी घेतली आहे. अलिकडेच विकी जैनच्या आईने अंकितावर अनेक आरोप केले, टीका केली, तिच्याविषयी उलटसुलट भाष्य केलं. या सगळ्यावर आता अंकिताच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच विकीची आई बिग बॉसच्या घरात गेली होती. या शोमध्ये त्यांनी अंकिताला बरंच खरंखोटं सुनावलं. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर दिलेल्या एका मुलाखतीमध्येही अंकितावर  ताशेरे ओढले. त्यांनी अंकितावर केलेल्या टीकेमुळे आता विकी आणि अंकिताच्या नात्यावर नेटकरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यामध्येच आता अंकिताच्या आईनेही याविषयी भाष्य केलं आहे.

काय म्हणाली अंकिताची आई?

एकीकडे विकीची आई अंकिताला नाव ठेवत असतानाच अंकिताच्या आईने मात्र विकीचं कौतुक केलं आहे. "विकीचं अंकितावर मनापासून प्रेम आहे. त्याने तिला कायम भावनिकदृष्ट्या पाठिंबा दिला आहे. आता मी खरंच फार रिलॅक्स आहे असं म्हणेन.कारण, आम्ही त्या दोघांना भेटलो आणि त्यांच्याशी याविषयावर बोललो सुद्धा", असं अंकिताची आई म्हणाली.

पुढे त्या म्हणतात, "अंकिता कधीच मनात काही ठेवत नाही. तिला वाटलं की ती थेट तोंडावर बोलून मोकळी होते. नवरा-बायकोमध्ये तर या गोष्टी होतच राहतात. आधी भांडण करतात मग नंतर विसरुन जातात."

दरम्यान, अंकिताने विकीला लाथ मारल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी अंकिताच्या आईला फोन केला होता. आणि, तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला असंच लाथेने मारायचात का? असा प्रश्न विचारला होता. यावरही अंकिताच्या आईने भाष्य केलं. मी पहिल्यांदाच माझ्या मुलाला असं रडताना पाहिलं होतं. नवरा-बायकोमध्ये तर या लहानमोठ्या गोष्टी होतच राहतात.तसंच अंकिता किंवा विकी दोघांपैकी कोणाही जिंकलं तरी आनंदच आहे. कारण, शेवटी ट्रॉफी एकाच घरी येणार आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकार