अंकिता लोखंडेबिग बॉस 17 च्या घरात असलेल्या सगळ्यात चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. अंकिताला आपलं बिग बॉसच्या घरात अनेकवेळा भांडतावा पाहिलं आहे. मात्र अलिकडेच्या एपिसोडमध्ये ती भावुक झालेली दिसली. अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या घरात नवीद सुळेसोबत बोलताना आपलं मन मोकळं केलं. अभिनेत्रीने पहिल्यांदा विकी जैनशी तिच्या नात्याबद्दल बोलताना सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी देखील भाष्य केलं.
अंकिता लोखंडेने यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि ब्रेकविषयी केला. ब्रेकअपबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मी त्यातून बाहेर पडू शकले नाही. मी त्याला सोडू शकले नाही. माझ्यासाठी त्या नात्यातून बाहेर पडणे आणि दुसर्याला डेट करणे खूप कठीण गोष्ट होती. मला वाटायचं मी कधीच हे करू शकणार नाही. तो खूप वेदनादायक टप्पा होता."
अंकिता पुढे म्हणाली, असं होतं. एक माणूस पुढे जातो आणि दुसरा तिथेच अडकून राहतो, पण मी तरीही प्रेमावर विश्वास ठेवणं कधीच थांबवलं नाही. मी प्रेमासाठी तयार होते. मला माझ्या आयुष्यात प्रेम हवं होतं आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली ."
ब्रेकअपमधून बाहेर पडणे आणि विकीला भेटणे याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मला यातून बाहेर पडायला वेळ लागला. जवळपास अडीच वर्षे लागली आणि जेव्हा मी नॉर्मल झाले, तेव्हा विकीने माझ्या आयुष्यात एंट्री केली. तो फक्त माझा मित्र होता, त्याशिवाय मी त्याला इतर कोणत्याही नजरेनं पाहिलं नव्हतं. मी विकीशी माझ्या एक्स बॉयफ्रेण्डविषयी बोलायचे. मला वाटायचं कधीतरी तो माझ्याकडे परत येईल. मी त्याची वाट पाहत राहिले.''
विकी जैनच्या प्रपोजलबाबत बोलताना अंकिता म्हणाली, "हे सगळं कधी घडलं मला पण नाही माहिती, पण विकी माझ्या आयुष्यात आला आणि त्याने थेट मला लग्नासाठी प्रपोज केलं. आम्ही तेव्हा फक्त मित्र होतो. त्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी विकिसोबत लग्नाचा निर्णय घेतला. मी खूप दिवस वाट पाहिली होती. मी खूप कठीण काळ पाहिला होता, पण जेव्हा विकी माझ्या आयुष्यात आला तेव्हा माझ्या आयुष्यात सगळं काही बदललं."