Join us

क्या बोलती पब्लिक! अंकिता आणि विकी या दोघांपैकी सर्वात मजबूत सदस्य कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:46 IST

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्याची चर्चा सर्वांत जास्त रंगली आहे.

बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले जवळ आला असून स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक सदस्य महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टास्कमध्ये १०० टक्के देत आहे.  पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्याची चर्चा सर्वांत जास्त रंगली आहे.  दोघांमधील वाद काही कमी होण्याचं नाव घेतं नाहीये. त्यांची या शोमधील भांडणं, मतभेद प्रेक्षकांनी पाहिली आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं जात आहे. यातच आता विकी आणि अंकिता यांच्यामध्ये सर्वात मजबूत सदस्य कोण हे समोर आलं आहे. 

कलर्सने सोशल मीडियावर एक सर्वेक्षण केले आहे. या पोलसाठी कलर्सने अंकिता आणि विकीबद्दल प्रेक्षकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात विकीला सर्वांत कमी मते मिळाली आहेत. पोलच्या निकालानुसार सोशल मीडियावर 59.3 टक्के लोकांनी अंकिताला मतदान केले. तर 40.7 टक्के लोकांनी विकीला मते दिली. 

मुनव्वर यांच्या चाहत्यांनी मात्र पोलवर कमेंट करत अंकिता आणि विकीला ट्रोल केलं. एका यूजरने लिहिले की, 'माझ्या मते, या दोघांना बाहेर काढा. दोघांपैकी कोणीही मजबूत नाही'. आणखी एका यूजरने लिहिले की, 'ते संपूर्ण सीझनमध्ये भांडत आहेत. त्याशिवाय दुसरे काय केले?'. मुनव्वरच्या चाहत्यांच्या मते 'बिग बॉस 17' मध्ये एकच मजबूत सदस्य आहे आणि तो म्हणजे मुनव्वर. 

  'बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉससेलिब्रिटीटिव्ही कलाकारबॉलिवूडसलमान खान