Join us

Bigg Boss 17 : अंकिताला सतत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीवर भडकली देवोलिना, म्हणाली, "पत्नीचा अपमान करणं म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 14:12 IST

टीव्हीवर अंकिताला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीला देवोलिनाने अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे. देवोलिनाने यासंदर्भात ट्वीटही केलं आहे.

'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. पण, पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात विकी आणि अंकितामध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरातील अंकिता-विकीचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. विकीने अंकिताला दिलेल्या वागणुकीमुळे चाहतेही नाराज आहेत. सलमाननेही त्याला यावरुन सुनावलं होतं. आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने यावर भाष्य केलं आहे. 

टीव्हीवर अंकिताला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीला देवोलिनाने अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे. देवोलिनाने यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. "पती-पत्नीमध्ये या गोष्टी होत राहतात. पण, प्रत्येक दिवशी पत्नीचा अपमान करणं म्हणजे मनोरंजन नाही आणि हा खेळाचा भागही होऊ शकत नाही," असं देवोलिनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये तिने 'बिग बॉस १७' असा हॅशटॅगही वापरला आहे. 

देवोलिनाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत "अंकिताला तो ज्याप्रकारे वागणूक देत आहे. ते पाहणं अपमानास्पद आहे," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "तू तर मला कधी आनंद दिलाच नाहीस...विकी हे अंकिताला बोलल्यावर मी आश्चर्यचकित झाले. ही कोणती भाषा आहे," अशी कमेंट केली आहे. 

'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने २०२१ साली विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधली. विकी जैन एक व्यावसायिक आहे. 'बिग बॉस'मध्ये येण्याआधी ते दोघेही स्मार्ट जोडी या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. 

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेदेवोलिना भट्टाचार्जी