'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम स्पर्धकांमुळे तसेच त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. 'वीकेंड का वार' या सेगमेंटमध्ये 'बिग बॉस'च्या घरातून कोणता सदस्य बाहेर पडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अशातच बिग बॉस 17 मध्ये एलिमिनेशन पार पडलंय. बिग बॉस 17 मधुन मनस्वी ममगईला घरातुन बाहेर जावं लागलंय. प्रेक्षकांच्या कमी मतांंमुळे ममगईचा बिग बॉस 17 मधला प्रवास संपलाय.
'वीकेंड का वार' या सेगमेंटमध्ये मनस्वी, समर्थ, ईशा, मनस्वी, अरुण आणि सना हे सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते. मनस्वी ही घरातील वाईल्ड कार्ड स्पर्धक होती. तिला सर्वांत कमी मते मिळाली आणि अभिनेत्रीला घराबाहेर जावं लागलं. त्याचवेळी सना खान पुन्हा एकदा बेघर होण्यापासून बचावली. बिग बॉस या घरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण या घरात शेवटपर्यंत टिकून राहावं असं वाटतं. पण ते शक्य नसतं. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असतं.
मनस्वी ममगई 2006 मध्ये एलीट मॉडेल लूक इंडिया, 2008 मध्ये मिस टुरिज्म इंटरनॅशनल आणि 2010 साली फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात मनस्वीने परफॉर्म केले होते. शिवाय तिने अजय देवगणच्या अॅक्शन जॅक्सन सिनेमात काम केलं आहे. तर नुकतंच तिने काजोलच्या 'द ट्रायल' वेबसिरीजमध्ये भूमिका साकारली.
याआधी 'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं होतं. त्यवेळी अभिनेत्री सोनिया बन्सलला घराबाहेर जावं लागलं. या शोमध्ये कधी काय होइल सांगता येत नाही. कधी कुणाचा शो मधील हा शेवटचा आठवडा असू शकतो, हे सांगणे ही तितकेच अवघड आहे. आता पुढच्या एलिमिनेशमध्ये कोण तग धरून राहतात, कोण घराबाहेर पडतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.