Join us

'बिग बॉस' फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल, ४ महिन्यांपासून येत आहेत पॅनिक अटॅक, झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:18 AM

'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अभिनेत्रीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं.

'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्री सोनिया बंसल हिला प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. अचानक बरं वाटत नसल्याने अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोनियाचा हॉस्पिटलमधील व्हिडिओदेखील समोर आला आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन सोनियाचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्रीची वाईट अवस्था झाल्याचं दिसत आहे. सोनियाला गेल्या ४ महिन्यांपासून पॅनिक अटॅक येत होते. त्याबरोबरच तिचं मानसिक स्वास्थ्यही बिघडलं होतं. सोनिया सोमवारी(२२ जुलै) रात्री एका अवॉर्ड फंक्शनसाठी गेली होती. तिथून परतताना तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

सोनिया बंसल बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली होती. पण, पहिल्याच आठवड्यात तिला घरातून बाहेर पडावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी ती पहिली कंटेस्टंट होती. सोनिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिची अशी अवस्था पाहून चाहतेदेखील चिंतेत आहेत.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार