Join us

'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय अन् समर्थ जुरेल यांनी एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअपवर चिंटूने सोडलं मौन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 13:33 IST

अभिनेत्री ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसत आहेत. दोघेही बिग बाॅसच्या घरात सहभागी झाले ...

अभिनेत्री ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसत आहेत. दोघेही बिग बाॅसच्या घरात सहभागी झाले होते. यावेळी अनेकदा थेट टीव्हीवर दोघे रोमान्स करताना दिसले. तर तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारही बिग बॉसच्या घरात होता. त्यामुळे हे तिघेही चांगलेच चर्चत आले होते.  ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता यातच दोघांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. 

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचं ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.  आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलताना समर्थ म्हणाला, 'ईशा आणि मी आता एकत्र नसून आमचं ब्रेकअप झालं आहे. आमच्यात काय घडलं याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. फक्त एवढेच सांगेन आता आम्ही एकत्र नाही आहोत'.

समर्थ जुरैल आणि ईशा मालवीय हे 'उडारिया' या शोमध्ये एकत्र दिसले होते. या शोमध्ये दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं होतं. जेव्हा ईशानं बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा तिला पाठिंबा देण्यासाठी समर्थनेदेखील बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडियाटेलिव्हिजन