Join us

'ती बिग बॉसची निरुपा रॉय, तिला पाहिलं तरी राग येतो'; अंकिताचा गेम पाहून भडकली फराह खान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:31 AM

Farah khan: अंकिताचं घरातलं वागणं पाहून फराहने नाराजी व्यक्त केली आहे.

छोट्या पडद्यावर यंदा बिग बॉसचं १७ वं (bigg boss 17)  पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून सातत्याने त्यातील स्पर्धक चर्चेत येत आहेत. यात खासकरुन अंकिता लोखंडे (ankita lokhane) आणि विकी जैन (vicky jain)  ही जोडी चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणारी ही जोडी या घरात आल्यापासून सातत्याने एकमेकांशी वाद घालत आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्याचं नेमकं सत्य काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. इतंकच नाही तर त्यांच्यातील वाद आता प्रेक्षकांची डोकेदुखी ठरु लागली आहे. लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खान (farah khan) हिनेही या जोडीचा कंटाळा आल्याचं म्हटलं आहे.

 बिग बॉसची फॅन असलेली फराह खान हिने अलिकडेच भारती सिंग आणि हर्षसोबत झालेल्या संवादामध्ये अंकिता-विकीविषयी भाष्य केलं. अंकिताला पाहून आता चीड येते असं ती म्हणाली. तसंच घरातील अन्य सदस्यांविषयीदेखील तिने तिचं मत मांडलं.

"मी हा सीझन पाहात असून मला अभिषेक कुमार आवडतोय. आधी तो मुर्खासारखं वागत होता पण आता चांगलं खेळतोय. आधी तो फार आक्रमक होता. सुरुवातीला सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाझची कॉपी करायचा. अंकिता तर बिग बॉसची निरुपा रॉय  आहे. कपल्समध्ये मला विकी जैन आवडतो. ३-४ आठवडे मला विकी आवडत होता. तर, अंकिताचा खूप राग यायचा. मी तिला चांगलं ओळखते. घरात ती निरुपा रॉय असल्यासारखी का वागतीये हेच कळत नाही", असं फराह म्हणाली.

पुढे ती म्हणते, नील आणि ऐश्वर्या दोघेही ग्रेट आहेत. मी आजपर्यंत कोणालाही आपल्या नवऱ्यासोबत असं बोलताना पाहिलं नाही.दरम्यान,  अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडण होत असल्यामुळे लोक आता त्यांना ट्रोल करु लागले आहेत. तर, ऐश्वर्या आणि नील ही जोडी कायम एकमेकांना सांभाळून घेताना दिसते. त्यामुळे ही जोडी हळूहळू लोकप्रिय ठरत आहे. 

टॅग्स :बिग बॉसफराह खानअंकिता लोखंडेसेलिब्रिटीटेलिव्हिजनभारती सिंग