'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना एका मागोमाग एक सरप्राइज देत आहे. टीव्ही अभिनेत्री ईशा मालवीय आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे संबंध सुधारत असतानाच घरात ईशाचा बॉयफ्रेंड समर्थची एन्ट्री करत बिग बॉसने धमाका केला होता.
ईशा आणि समर्थ अनेकदा 'बिग बॉस'च्या घरात एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले. आता त्यांचा 'बिग बॉस'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते रोमँटिक झालेले दिसत आहेत. ईशा आणि समर्थचा हा व्हिडिओ 'बिग बॉस'च्या घरातील बेडरुममधील आहे. यामध्ये समर्थ ईशाला लाडीगोडी लावताना दिसत आहे. पहिल्यांदा तो ईशाच्या पोटावर किस करतो. त्यानंतर तिच्या मानेवर आणि गालावर किस करतो. ईशा आणि समर्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत त्यांना ट्रोल केलं आहे.
"तुम्ही चुकीच्या शोमध्ये आला आहात", असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा. यांनी बिग बॉसला आशिकीची धर्मशाळा बनवून टाकलं आहे," अशी कमेंट केली आहे. "टेम्पटेशन आयलँडवर पाठवा", असंही एकाने म्हटलं आहे. "त्यांना वाटतंय हे स्प्लिट्सविला आहे," अशी कमेंटही केली आहे. "कलर्सचं यांना प्रोत्साहन देत आहे," असंही एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, ईशा मालवीय ही घरातील चर्चेतील स्पर्धकांपैकी एक आहे. ईशाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर समर्थदेखी टीव्ही अभिनेता आहे.