Join us

हा कसला फॅमिली शो? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांची बिग बॉसवर टीका, सलमानलाही केलं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 9:20 AM

दरम्यान या व्हिडिओनंतर सलमानसह बिग बॉसवर टीकेची झोड उठली आहे.

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. भांडणांमुळे प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये अनेक जोड्याही बनतात. काही जोड्या घरातून बाहेर पडल्यावरही टिकतात तर काहींचं नातं तुटतं. सध्या हा या सिझनचा चौथा आठवडा सुरु आहे. दरम्यान ईशा मालवीय (Isha Malviya) आणि समर्थ जुरैल (Samarth Jurel) यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. 

शनिवारी 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानने ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यातील लव्हट्रँगलबाबत ईशाची चांगलीच कानउघाडणी केली. ईशा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दोन मुलांसोबत प्रेमाचं नाटक करत असल्याचा खुलासा सलमानने केला. दरम्यान एका एपिसोडमध्ये समर्थ आणि ईशा रोमँटिक झालेले दिसले. रात्री घरातील लाईट्स बंद झाल्यानंतर दोघंही एकमेकांकडे बघत एकाच बेडवर झोपले होते. तेवढ्यात समर्थने ईशाला किस केल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं. दोघंही खूपच कोजी झाले होते. मात्र त्यांच्या या रंगात अभिषेक भंग करताना दिसतो. तो आपलं ब्लँकेट घेण्यासाठी खोलीत येतो आणि त्यांना पाहतो. तो समर्थला म्हणतो, भाई, कॅमेरा आहे जरा सांभाळून. असं म्हणून तो आपलं ब्लँकेट घेऊन बाहर जातो आणि सोफ्यावर झोपतो.

दरम्यान या व्हिडिओनंतर सलमानसह बिग बॉसवर टीकेची झोड उठली आहे. 'हा आहे का तुमचा फॅमिली शो' अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे. बिग बॉसमध्ये या लव्हट्रँगलची जोरदार चर्चा आहे. सलमानच्या कानउघाडणीनंतर नक्की काय बदल होतात हे या आठवड्यात कळेलच. दरम्यान शनिवारी मनस्वी ममगई शोमधून आऊट झाली आहे. कमी वोट मिळाल्याने तिला बाहेर पडावे लागले. एक आठवड्यातच तिला बाहेर जावं लागल्याने तिचे चाहते निराश झालेत.

टॅग्स :बिग बॉससलमान खानट्रोलसोशल मीडिया