Join us

कहर झाला! बिग बॉस स्पर्धकावर विकी जैनने टाकली मिरची पूड; Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:47 IST

Bigg boss 17:सध्या सोशल मीडियावर बिग बॉस 17 चा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉस 17 (bigg boss 17) विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे.  येत्या २ आठवड्यांमध्ये या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्यामुळे आता घरातील स्पर्धकांना कठिणातील कठीण टास्क देण्यात येत आहेत. यामध्येच आता या घरात नॉमिनेशन टास्क रंगणार असून या टास्कचा प्रोमो समोर आला आहे. विशेष म्हणजे या टास्कमध्ये घरातल्या स्पर्धकांनी त्यांच्या हद्द पार केल्या आहेत.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात मुन्नवर आणि मन्नारा यांना घरातील इतर स्पर्धकांनी प्रचंड टॉर्चर केल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर मुनव्वर आणि मन्नारावर विकी जैनने चक्क मिरचीची पूड फेकली.

घरातल्या स्पर्धकांना टॉर्चर टास्क देण्यात आला आहे. यात टीम A मध्ये मुनव्वर, अभिषेक, मन्नारा आणि अरुण आहेत. तर, टीम B मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि ईशा हे चार जण आहेत. यात या टास्कमध्ये अभिषेक, मुनव्वर आणि मन्नारा यांना टीम  B च्या स्पर्धकांनी वाईटरित्या टॉर्चर केलं.

एकीकडे अभिषेकच्या चहऱ्यावर टीम  B च्या स्पर्धकांनी व्हॅक्स लावलं . तर, दुसरीकडे विकी आणि आयशा यांनी मुनव्वर आणि मन्नारा यांच्या चेहऱ्यावर चक्क मिरचीची पूड टाकली. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी सुद्धा टाकलं. परंतु, मन्नारा, मुनव्वर आणि अभिषेक समोरच्या टीमसमोर झुकण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या टॉर्चर टास्कमध्ये जी टीम जिंकेल ती या आठवड्यात नॉमिनेशनपासून वाचणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक हा टास्क जिंकायचा प्रयत्न करत आहे. बिग बॉस १७ मध्ये आता शेवटचे ८ स्पर्धक राहिले आहेत. या शोचा ग्रँड फिनाले येत्या २८ जानेवारीला होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनअंकिता लोखंडेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार