Join us

Bigg Boss 17 : मन्नारा चोप्रासोबतच्या रिलेशनशीप चर्चेवर मुनव्वर फारुकीनं सोडलं मौन, म्हणाला - "तशी फिलिंग्स..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:52 PM

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात मन्नारा चोप्रा आणि मुनव्वर फारुकी यांची बॉन्डिंग चाहत्यांना खूप भावली. त्यावर आता मुनव्वरने मौन सोडले आहे.

बिग बॉसच्या (Bigg Boss 17) घरात मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) आणि मुनव्वर फारुकी (Munawar Farooqui) यांच्या जोडीची बरीच चर्चा झाली आहे. खेळाच्या सुरुवातीपासूनच दोघेही खूप चांगले मित्र बनले होते. दोघांचे बॉन्डिंग खूप चांगले झाले होते पण काही काळानंतर त्यांची मैत्रीही बिघडू लागली. मन्नारा आणि मुनव्वरकडे बघून त्यांच्यात मैत्रीपेक्षाही काहीतरी जास्त आहे असं वाटत होतं. आता शो संपला आहे आणि सगळे बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत. शो संपल्यानंतर मुनाव्वर फारुकीने मन्नारा चोप्रासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले संपला आहे. या सीझनचा विजेता दुसरा कोणी नसून मुनावर फारुकी आहे. मुनव्वर आणि मन्नारा या दोघांनीही टॉप ३ मध्ये स्थान मिळवले होते पण कमी मतांमुळे तिला टॉप २मध्ये स्थान मिळवता आले नाही. आता शो जिंकल्यानंतर मुनव्वर मन्नाराबद्दल बोलला आहे.

मुनव्वर रिलेशनशिप स्टेटसवर म्हणाला...मीडियाशी बोलताना मुनव्वरला विचारण्यात आले की, सुरुवातीला तुला मन्नाराबद्दल काय भावना होत्या का? यावर मुनव्वर म्हणाला की, मी तुम्हाला खरे सांगतो, जेव्हा मी मन्नाराला पाहिले तेव्हा मला समजले की ती खरोखर अशी आहे. तिला काही कळत नाही. जेव्हा माझी तिच्याशी मैत्री झाली तेव्हा मी तिला गोष्टी समजावून सांगायचो आणि मी तिच्यासाठी केअरफुल होतो. तिची काळजी घ्यायचो. मला त्यात काही दिसले तर मला वाटले की ते काहीतरी वेगळे आहे, तर मी एक पाऊल मागे घ्यायचो. यामुळे माझ्या आणि मन्नाराच्या नात्यात काही फरक पडला नाही. आम्ही फक्त कंफर्टेबल होतो. तशा भावना नव्हत्या.

मन्नारा मुनव्वरबद्दल म्हणाली...मन्नाराही घराबाहेर पडली आणि अनेक मुलाखतींमध्ये मुनव्वरबद्दल बोलली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली की माझी मुनव्वरशी मैत्री झाली आहे आणि त्याचीही माझ्याशी मैत्री झाली आहे. मैत्री ही कधीच एका बाजूची नसते, ती दोन्ही बाजूने होते.

टॅग्स :बिग बॉस